Posts

Showing posts from August, 2026

अभिनेता रजत बेदींची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री*

Image
मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेले अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी हे आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, देवदास’, ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी सिनेमाला समृद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होत...

स्नायूंना इजा न पोहोचवता झाली टोटल हिप रिप्लेसमेंट

Image
४२ वर्षीय व्यक्ती शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागला. पुणे, २६ ऑगस्ट २०२६: दुचाकी अपघातात मांडीच्या हाडाच्या गोलाकार भागाला फ्रॅक्चर झाल्याने पुण्यातील ४२ वर्षीय व्यक्तीची टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे डायरेक्ट अँटीरीअर अँप्रोच (डीएए) ही पद्धती वापरून मांडीच्या हाडाच्या आजूबाजूच्या स्नायूंना कोणतीही इजा न पोहोचवता ही शस्त्रक्रिया झाल्याने रुग्ण दुसऱ्याच दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या पायावर पूर्ण वजन देऊन चालू शकला.सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे ही शस्त्रक्रिया पार पडली.     डीएए या पद्धतीत सभोवतालच्या स्नायूंना इजा न पोहोचवता समोरून हिप जॉइंटपर्यंत पोहोचले जाते. ही अत्याधुनिक पद्धती असून या मुळे आजूबाजूच्या स्नायूंना कोणतीही दुखापत होत नाही. दुचाकीवरून पडल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील तपासणीत डाव्या कॉलरबोनचे (क्लॅव्हिकल) फ्रॅक्चर आणि फिमोरल हेड (मांडीच्या हाडाचा वरचा गोलाकार भाग जो हिप जॉइंट बनवतो) विस्थापित झाल्याचे आढळले. फिमोरल हेड फ्रॅक्चरवर उपचाराचा एक पर्याय म्हणजे फ्रॅक्चर...

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे 23 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात आयोजन**पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची पत्रकार परिषद संपन्न

Image
पुणे -येत्या डिसेंबर महिन्या पर्यंत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातलेली आहे या अनुषंगाने आज महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने पत्रकार भवन, पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.    या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात, राज्य सचिव के. एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे,विभागाचे सचिव मुरलीधर मांजरे, पुणे विभागाचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, राज्य प्रतिनिधी प्राचार्य राजमुजावर उपस्थित होते.   या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात म्हणाले की येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने उमेदवार दिला जाणार आहे. ही उमेदवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी, मतदारसंघातील संपर्क, शिक्षक संघटनेशी असणारी बांधिलकी, निवडून येण्याची क्षमता तसेच शिक्षकांच्या प्रति असलेली तळमळ या गोष्टी विचारात घेऊन दिली जाणार आहे.या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र राज्य शिक्षक...

दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे संस्थेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

Image
पुणे -प्रिंट झालेले फोटो ते क्षण जगलेले आठवणी जागवतात असे उदगार प्रसिद्ध बाल छायाचित्रकार प्रियदर्शनी भोर यांनी दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे तर्फे पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे प्रसिद्ध छायाचित्रकारांचे छायाचित्र प्रदर्शन 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध बाल छायाचित्रकार प्रियदर्शनी भोर व फाईन आर्टिस्ट सुहास एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष रामनाथ भट,खजिनदार ऍड.किशोर जगदाळे, ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील कापडिया, सचिव जी करुणाकर,संस्थेचे माजी अध्यक्ष विकास शिंदे,संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेंद्र नावडे, संगीता लुणावत, प्रशांत पडमळकर उपस्थित होते.  पुढे बोलताना प्रियदर्शनी भोर म्हणाल्या की प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राची वेगळी कथा असते. त्यामुळे प्रदर्शनाचे महत्त्व जास्त आहे. आपल्या व्यावसायिक कामात वेळ मिळत नाही त्यामुळे का...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘लग्न आणि बरंच काही’चे मंत्रालयात पोस्टर अनावरण; स्त्रीच्या दृष्टिकोनातून उलगडणार नवी कथा

Image
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण आणि वेगळ्या विषयांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, स्त्रीच्या भावविश्वासोबतच लग्नानंतरच्या आयुष्यातील बदलते नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रवास मांडणाऱ्या ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे आज मंत्रालयात अनावरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण झाले. या अनावरणामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘लग्न आणि बरंच काही’च्या आशयाची आणि त्यामागील महिला नेतृत्वाची चर्चा रंगू लागली आहे. म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले आहे. पोस्टरचे अनावरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चित्रपटाच्या विषयाचे कौतुक केले. मुलीच्या जन्मापासून बालपण, तारुण्य आणि पुढील आयुष्यापर्यंतच्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाह...