'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
आज भारतात 'मंजुमल बॉईज' आणि 'अवेशम'सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील 'पंचायत', 'फॅमिली मॅन'सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा 'विषय हार्ड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज याची निर्मिती असलेल्या 'विषय हार्ड'चे निर्माते गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथालेखनही केलं आहे. ...