Posts

Showing posts from September, 2026

'दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं

Image
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त एका अनोख्या आणि भावनिक क्षणाने पार पडला. शुभारंभाच्या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांनी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालत चित्रपटाच्या यशासोबतच ‘दर्याभवानी’शी जोडलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि टीम सदस्याच्या सुख-समाधानासाठी मनापासून प्रार्थना केली. या गाऱ्हाण्यात चित्रपटाच्या निर्मितीसाठी पडद्यामागे आणि पडद्यावर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले. संपूर्ण टीमच्या कल्याणासाठी केलेल्या या प्रार्थनेमुळे ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त केवळ चित्रपटाच्या शुभारंभाचा सोहळा न राहता, एकजूट, कृतज्ञता आणि आपुलकीचा सुंदर क्षण ठरला. ‘दर्याभवानी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली. लेखक-...

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा

Image
पुणे, ८ सप्टेंबर २०२६: राज्यातील व्यावसायिक शिक्षक आणि कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वांत जुन्या आणि मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (पीटीएएम) ने प्रस्तावित महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे नोंदणी व नियमन कायद्यातील तरतुदींचा फेरविचार करून कायदा अंतिम करण्यापूर्वी राज्य सरकारने संबंधित घटकांशी अर्थपूर्ण संवाद साधावा, अशी मागणी मंगळवारी येथे केली. शहरात आज झालेल्या पत्रकार परिषदेत पीटीएएम चे अध्यक्ष डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, संघटनेचा योग्य, संतुलित आणि पारदर्शक नियमनाला पाठिंबा आहे; मात्र कोचिंग संस्थांवर अवाजवी अनुपालनाचा बोजा टाकणाऱ्या तसेच मनमानी प्रशासकीय कारवाईला वाव देणाऱ्या तरतुदींना संघटनेचा विरोध आहे. या वेळी पीटीएएमचे सचिव डॉ. नितीन कदम, माजी अध्यक्ष विजय पवार, माजी सचिव हनुमंत भोसले, कार्याध्यक्ष प्रल्हाद दौंड आणि पुणे कोअर कमिटी सदस्य दुर्गेश मंगेशकर उपस्थित होते. या कायद्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये पीटीएएमच्या वतीने श्री विजयराव पवार, श्री ...