भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय 'भागीरथी missing' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सह्याद्री मोशन पिक्चर्स' निर्मित आणि सचिन वाघ दिग्दर्शित, प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत 'भागीरथी missing' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या ट्रेलरला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, तसेच चित्रपट बघण्याविषयी उत्कंठा निर्माण झाल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी सोशल मिडियावर व्यक्त केली आहे. 'भागीरथी missing' बद्दल बोलताना निर्माता - दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते करमणुकीसाठी त्यामुळे चित्रपट तयार करताना करमणुकीला प्राधान्य दिले गेले आहे बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना तिचे पुर्व आयुष्य उलगडत जाते, हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सध्या एकूणच महिलांव...