मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे ५० हून अधिक MICS प्रक्रिया यशस्वी
एकेकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हृदयविकार सध्या तरुण लोकसंख्येवर वाढत्या प्रमाणात परिणाम करत आहे, धक्कादायक आकडेवारीनुसार 25% हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये होतात. पारंपारिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून 50 पेक्षा जास्त मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी (MICS) केसेस यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत हे जाहीर करताना मेडीकव्हर हॉस्पिटल भोसरीला अभिमान वाटतो. MICS प्रक्रिया कोरोनरी धमनी रोग, हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारावर उपचार करण्यासाठी करण्यात येते. डॉ आशिष बाविस्कर, कार्डिओ-व्हस्क्युलर थोरॅसिक सर्जन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी म्हणाले, "एमआयसीएस हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच वापर दिसून येतो, रुग्णांना बरे होण्याची वेळ, उत्कृष्ट परिणाम तसेच कमीतकमी आक्रमकतेचा वापर केला जातो. आमच्या रूग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करून या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे." ते पुढे म्हणा...