Posts

Showing posts with the label मंगेश कदम आणि लीना भागवत मध्यवर्ती भूमिकेत

लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप’ रंगभूमीवर

Image
‘इवलेसे रोप’ छान डौलदार बहरावं यासाठी त्याला चांगलं खतपाणी घालावं लागतं. नात्याचंही तसंच असतं ते चांगलं बहरावं यासाठी प्रेमाचं  आणि विश्वासाचं खतपाणी  घालायचं असतं. मुरलेल्या नात्याची अशीच  खुमासदार  गोष्ट घेऊन लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे १३ वर्षांनी रंगभूमीवर आल्या आहेत. रावेतकर प्रस्तुत, नाटकमंडळी प्रकाशित आणि खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई  निर्मित, ‘इवलेसे  रोप’ या  नव्या नाटकाचा  शुभारंभ ८ मार्चला आचार्य  प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर  कल्याण येथे  होणार आहे.  मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेते मंगेश कदम, अभिनेत्री लीना भागवत यांच्यासोबत मयुरेश खोले, अनुष्का गिते, अक्षय भिसे यांच्या भूमिका नाटकात आहेत.     नातं ह्या शब्दाची जादूच वेगळी आहे. प्रत्येक नात्याची मजा ती उलगडण्यातच येते,पण जास्त आनंद ते नातं जपण्यात आणि आयुष्यभर निभावण्यात असते. मोजायला गेल्या तर कालांतराने नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नातं जेव्हा पिकतं तेव्हा अधिक गोड होतं या  टॅगलाइनसह आलेल्या ‘इवलेसे  रोप’ या नाटकात ‘माई’...