दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे संस्थेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
पुणे -प्रिंट झालेले फोटो ते क्षण जगलेले आठवणी जागवतात असे उदगार प्रसिद्ध बाल छायाचित्रकार प्रियदर्शनी भोर यांनी दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे तर्फे पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे प्रसिद्ध छायाचित्रकारांचे छायाचित्र प्रदर्शन 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध बाल छायाचित्रकार प्रियदर्शनी भोर व फाईन आर्टिस्ट सुहास एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष रामनाथ भट,खजिनदार ऍड.किशोर जगदाळे, ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील कापडिया, सचिव जी करुणाकर,संस्थेचे माजी अध्यक्ष विकास शिंदे,संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेंद्र नावडे, संगीता लुणावत, प्रशांत पडमळकर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रियदर्शनी भोर म्हणाल्या की प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राची वेगळी कथा असते. त्यामुळे प्रदर्शनाचे महत्त्व जास्त आहे. आपल्या व्यावसायिक कामात वेळ मिळत नाही त्यामुळे काहीजण आपला छायाचित्राचा छंद जोपासत आहेत.
आपल्या भाषणात प्रसिद्ध कलाकार सुहास एकबोटे म्हणाले की सुख विकत घेता येते परंतु समाधान विकत घेता येत नाही सुखापेक्षा समाधान महत्त्वाचे आहे. लाखो शब्दांनी व्यक्त होता येत नाही परंतु ते छायाचित्राने व्यक्त होता येते असे एक हे माध्यम आहे. या कलेने मला भरभरून दिले आहे.
यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील कपाडिया म्हणाले की प्रत्येकाने माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे. सध्या कलाक्षेत्र जास्त जाती निर्माण झाल्या आहेत. कलेला खूप विस्तृत दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
यावेळी आपल्या भाषणात दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे चे अध्यक्ष संजय वायचळ म्हणाले की रौप्य महोत्सवी वर्षात आम्हाला यशस्वीपणे चारही छायाचित्र प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
या छायाचित्र प्रदर्शनामध्ये 40 छायाचित्रकारांचे 125 छायाचित्र ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी 21 ऑगस्ट रोजी द सायलेंट लंग्न्वेज ऑफ कलर्स इन फोटोग्राफी या विषयावर मिलिंद ढेरे यांचा मास्टर क्लास आयोजित करण्यात आले होते.यामध्ये बोलताना मिलिंद ढेरे म्हणाले कि प्रॉडक्ट डिझाईनपासून रंगाचा विचार केला जातो. रंग व प्रकाश हे छायाचित्रात महत्वाचे आहेत..रंगाचा अभ्यास करणे गरजेचे असते. कला हे मेंदूचे खाद्य आहे. एक्सप्लोरिंग द फाईन आर्टस् फोटोग्राफिक व्हिजन या विषयावर विकास शिंदे,22 ऑगस्ट 2026 रोजी सायं 4.30 ते 6.30 या वेळेत एक्झिबिशन वॉल्क अँड जर्नी फ्रॉम प्रिंट टु स्क्रिन यावर सुनील कपाडिया यांच्या मास्टर क्लास चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाडळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार दि फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुण्याचे खजिनदार ऍड.किशोर जगदाळे यांनी मानले . या कार्यक्रमास छायाचित्र क्षेत्रातील मान्यवर व कलाप्रेमी उपस्थित होते. ये छायाचित्र प्रदर्शन 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी खुले असणार आहे.
Comments
Post a Comment