Posts

Showing posts from November, 2026

वयाच्या ७८व्या वर्षी सिताराम बढे यांची जलतरणात दमदार कामगिरी; ३ रौप्यपदकांची कमाई

Image
पुणे : वय हे केवळ एक आकडा आहे, हे आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सिद्ध करणारे श्री. सिताराम तुकाराम बढे (वय ७८ वर्षे) यांनी *महाराष्ट्र स्टेट मास्टर्स अँक्वेटिक चॅम्पियनशिप 2026* मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ३ रौप्यपदके पटकावली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत *श्री. बढे यांनी ४०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक* या तीन प्रकारांत सहभागी होत प्रत्येक प्रकारात रौप्यपदक मिळवले. विशेष म्हणजे, जलतरण क्षेत्रातील त्यांची ही यशस्वी वाटचाल गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. २०२४ : १ सुवर्ण + ३ रौप्य २०२५ : २ रौप्य + १ कांस्य २०२६ : ३ रौप्य अशा प्रकारे त्यांनी गेल्या तीन वर्षांत एकूण १० राज्यस्तरीय पदकांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये १ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्यपदक यांचा समावेश आहे. वयाच्या ७८व्या वर्षीही नियमित सराव, शिस्त, फिटनेस आणि जलतरणाची आवड कायम ठेवत स्पर्धात्मक स्तरावर केलेली त्यांची ही कामगिरी विशेष कौतुकास्पद आहे. त्यां...