Posts

तेरावा गोवा लघुपट महोत्सव 25 ऑक्टोबर रोजी

Image
पुणे दिनांक (प्रतिनिधी) _ नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञासाठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे.  सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील सभागृहामध्ये 25 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट या महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार आहेत .हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली. ज्येष्ठ लेखक, संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विनायक कुलकर्णी ,ज्येष्ठ चित्रपट समीक्षक कल्पना खरे ,ज्येष्ठ लेखक दिलीप कुकडे आणि पत्रकार मनोहर सप्रे यांच्या हस्ते महोत्सवातील विविध विभागातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या विविध लघुपटापैकी सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा 35 विभागांमध्ये पारितोषिके प्र...

शिक्षकांचे प्रश्न तत्परतेने सोडविणारे कार्यकर्ते : सुनील जगताप

Image
पुणे शिक्षक मतदार संघातून एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात सुनील जगताप हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या आंदोलनात सुनील जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पाचही जिल्ह्यांमध्ये विविध शाळा महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सुनील जगताप करत असून त्यांना शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक काळ शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारे शिक्षकांचे कार्यकर्ते म्हणून सुनील जगताप यांची ठसठशीत ओळख आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.  शिक्षकांच्या आलेल्या एका फोनवर शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक,प्राथमिक या ठिकाणी जाऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम जगताप यांनी केले आ...

केंब्रिजने शाळा नेत्यांना एकत्र आणले, शिक्षणाच्या भविष्यावर चर्चा

Image
पुणे :भारतीय शाळा आणि कुटुंबे जागतिक संधींसोबत भारताशी निगडित राहणारे शिक्षण शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर केंब्रिज इंटरनॅशनल एज्युकेशनने पुणे मधील शाळा नेत्यांना एकत्र आणून, वेगाने बदलणाऱ्या जगात वाढणाऱ्या पिढीसाठी शिक्षण कसे विकसित व्हावे यावर चर्चा केली. ही चर्चा अशा काळात होत आहे जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण यांच्यातील सीमारेषा अधिकाधिक अस्पष्ट होत आहेत. भारतीय शाळांसाठी प्रश्न हा आता राहिला नाही की राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम निवडावा, तर कोणते शिक्षण विद्यार्थ्यांना भारतात आणि जागतिक स्तरावर उपलब्ध संधींसाठी सर्वोत्तम तयार करेल. मुख्य विषयांमध्ये चर्चा झाली: ● भारतामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षणाची वाढती आवड ● भारतीय विद्यार्थी आणि कुटुंबांच्या बदलत्या आकांक्षा ● भारतीय शिक्षण क्षेत्राशी सुसंगतता राखत जागतिक मानकांचा समतोल साधणे ● भारतीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे ● क्रिटिकल थिंकिंग, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे ● AI चा शिक्षण, मूल्यांकन आणि भविष्यातील करिअरवर परिणाम ● विद्यार्थ...

मुक्ता–मीरा यांची २५ वर्षांची मैत्री.. आणि पहिली नाट्यनिर्मिती!

Image
काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या शक्तीचा आणि नवचैतन्याचा जागर केला जातो, त्याच मंगलपर्वात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या दोन मैत्रिणींच्या सर्जनशील सहप्रवासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. २५ वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून एकत्र काम केलेल्या या दोघी ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र येत आहेत. शुक्रवार २३ ऑक्टोबरला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.     अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव गाठीशी असलेल्या मीरा वेलणकर यांचं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिलंच पाऊल आहे. या नव्या सर्जनशील प्रवासातून ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विशेष म्हणजे मुक्ताला या नाटकाची संहिता बाहेर कुठे नव्हे, तर आपल्याच घरात, आपल्या भावाच्या लेखणीत सापडली! कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू बर्वे...

पुणे में 16 से 18 अक्टूबर तक ‘प्रवाह बिजनेस एक्सपो 2026’; उद्यमियों को मिलेगा व्यवसाय विस्तार का अवसर

Image
पुणे: अग्रवाल समाज पुणे की ओर से तीन दिवसीय ‘प्रवाह बिजनेस एक्सपो 2026’ का आयोजन 16 से 18 अक्टूबर तक डेक्कन कॉलेज मैदान, पुणे में किया जाएगा। ‘सोच से सफलता तक’ की थीम पर आधारित इस प्रदर्शनी का उद्देश्य उद्यमियों, व्यवसायियों, उद्योग जगत की प्रमुख हस्तियों और नागरिकों को एक मंच पर लाकर व्यवसाय विस्तार, नेटवर्किंग और ज्ञान के आदान-प्रदान को बढ़ावा देना है। यह जानकारी अग्रवाल समाज पुणे के अध्यक्ष ईश्वरचंद गोयल ने पत्रकार परिषद में दी। इस अवसर पर अग्रवाल समाज पुणे के सचिव संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष दीपक बंसल और सहसचिव मुकेश कनोडिया सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। प्रदर्शनी में विभिन्न क्षेत्रों की कंपनियां और उद्यमी अपने उत्पादों एवं सेवाओं का प्रदर्शन करेंगे। इसके साथ ही प्रमुख व्याख्यान, परिचर्चाएं, संवाद सत्र, व्यावसायिक नेटवर्किंग और सामुदायिक गतिविधियों का आयोजन किया जाएगा। महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों से व्यवसायियों की भागीदारी के कारण नए व्यावसायिक संबंध स्थापित करने और उद्योग जगत के विशेषज्ञों से संवाद करने का अवसर मिलेगा। प्रदर्शनी में सभी समाजों के नागरिकों के ...

प्रहार’च्या कलाकारांशी डीपीजीयू आणि डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त संवाद

Image
पुणे, ९ ऑक्टोबर २०२६ : ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (डीपीजीयू), डॉ. डी. वाय. पाटील गृप, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या वतीने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात आगामी ‘प्रहार’ चित्रपटाच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी कलाकारांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील अनुभव, प्रत्यक्ष जीवनातील कथेला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, प्रामाणिकपणा आणि समर्पण याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कलाकारांना विविध प्रश्न विचारले. कलाकारांनी विनोदी आणि उत्स्फूर्त शैलीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कलाकारांसोबत सेल्फी तसेच समूह छायाचित्रे काढून या संस्मरणीय...

अलिबाग लघुपट महोत्सवात मोकी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

Image
पुणे दिनांक 12 (प्रतिनिधी) - नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अलिबाग लघुपट महोत्सवात मोकी या लघुपटाचे सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली तर नेबुला या लघुपटासाठी शार्ली देशमुख यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये मस्कारा हा लघुकट सर्वोत्कृष्ट ठरला , तर द बॉर्डर या लघुपटासाठी कार्लो फिमो यांना आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आणि डार्कनर्स या लघुपटासाठी मीमी गिराड यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले. पुण्यातील सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन सभागृह मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विनायक कुलकर्णी, यांच्या सिने पत्रकार कल्पना खरे, ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन लचके यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. महोत्सवामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. रामकुमार शेडगे यांना द ट्रॅप या...