पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे 23 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात आयोजन**पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची पत्रकार परिषद संपन्न

पुणे -येत्या डिसेंबर महिन्या पर्यंत पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातलेली आहे या अनुषंगाने आज महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने पत्रकार भवन, पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. 
  या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात, राज्य सचिव के. एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे,विभागाचे सचिव मुरलीधर मांजरे, पुणे विभागाचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, राज्य प्रतिनिधी प्राचार्य राजमुजावर उपस्थित होते. 
 या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात म्हणाले की येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने उमेदवार दिला जाणार आहे. ही उमेदवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी, मतदारसंघातील संपर्क, शिक्षक संघटनेशी असणारी बांधिलकी, निवडून येण्याची क्षमता तसेच शिक्षकांच्या प्रति असलेली तळमळ या गोष्टी विचारात घेऊन दिली जाणार आहे.या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी दु. 12. 30 वा.
 राष्ट्रसेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन हायस्कूल मधील नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी संघटनेकडे रीतसर अर्ज करून मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे तसेच मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा व उमेदवारांचा उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, त्याचबरोबर पदवीधर मतदारांची नोंदणी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत असून लवकरात लवकर पदवीधरांनी नाव नोंदणी करावी असे महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळख; 'नागरिक सोशल फाउंडेशन'तर्फे 'आदर्श मंदिर स्पर्धा २०२६'चे आयोजन

ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो मध्ये डॉक्टर्स कडून महिला आरोग्य विषयक जनजागृती