Posts

Showing posts with the label इंद्रायणीकाठी गीताभक्ति अमृत महोत्सवासाठी संतांची मांदियाळी!

इंद्रायणीकाठी गीताभक्ति अमृत महोत्सवासाठी संतांची मांदियाळी!

Image
पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांचा जन्मोत्सव; पूज्य स्वामी राजेंद्रदासजी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अनुष्ठानाने सोहळ्याचा शुभारंभ  आळंदी: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदीनगरी सज्ज झाली आहे. आज सकाळी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळा भरल्याचीच अनुभूती मिळत होती. जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत आज सकाळी ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने शुभारंभ झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव ११ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.  आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज स्वामी विवेकानंदांसारख्या संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी ...