अलिबाग लघुपट महोत्सवात मोकी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट
पुणे दिनांक 12 (प्रतिनिधी) - नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अलिबाग लघुपट महोत्सवात मोकी या लघुपटाचे सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली तर नेबुला या लघुपटासाठी शार्ली देशमुख यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये मस्कारा हा लघुकट सर्वोत्कृष्ट ठरला , तर द बॉर्डर या लघुपटासाठी कार्लो फिमो यांना आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आणि डार्कनर्स या लघुपटासाठी मीमी गिराड यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले.
पुण्यातील सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन सभागृह मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विनायक कुलकर्णी, यांच्या सिने पत्रकार कल्पना खरे, ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन लचके यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते. महोत्सवामध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
रामकुमार शेडगे यांना द ट्रॅप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले तर योगायोग या लघुपटासाठी हर्षल अल्पे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आणि सारंग पंचाक्षरी यांना सर्वोत्कृष्ट संकलक म्हणून गौरविण्यात आले. निर्वात या लघुपटासाठी प्रवीण भांगे यांना दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले तर, द फ्रेंडशिप या लघुपटाला सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स लघुपट म्हणून गौरविण्यात आले. मराठी विभागामध्ये नशिबाचा शाप हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर पैज मराठीची या लघुपटासाठी यांना प्रकाश कोळेकर यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शन आणि देवदूत या लघुपटासाठी गणेश बिरदवडे यांना सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा लेखनाचे पारितोषिक मिळाले. अभिनय विभागामध्ये रवी झकाल यांना अवगुंठा या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले तर नशिबाचा शाप या लघुपाटासाठी धनश्री जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर पैज मराठीची मराठी ची या लघुकथासाठी रुद्र कोळेकर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment