पुण्यातील क्लिनिकमध्ये मुरुम, त्वचेची पुनर्प्राप्ती आणि वेदना व्यवस्थापनासाठी मल्टी-वेव्हलेंथ LED थेरपीची सुरुवात
ही नॉन-इन्व्हेसिव्ह म्हणजेच शस्त्रक्रियेशिवाय केली जाणारी प्रकाशाधारित थेरपी असून, त्वचेच्या काही विशिष्ट समस्या, विविध उपचारांनंतरची त्वचेची पुनर्प्राप्ती तसेच वेदना व्यवस्थापनासाठी तिचा वापर केला जात आहे.
पुणे, 16 सप्टेंबर 2026: पुण्यातील Aesthetics Medispa येथे Celluma LED थेरपीची सुरुवात करण्यात आली आहे. ही नॉन-इन्व्हेसिव्ह प्रकाशाधारित उपचारपद्धती असून, त्वचेच्या काही विशिष्ट समस्या, उपचारांनंतरची पुनर्प्राप्ती आणि वेदना व्यवस्थापनासाठी तिचा वापर केला जातो. Aesthetics Medispa येथे डॉ. शीतल जालोरी यांच्या क्लिनिकल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही थेरपी अधिकृतपणे सादर करण्यात आली.
या थेरपीमध्ये निळा, लाल आणि निअर-इन्फ्रारेड अशा तीन वेगवेगळ्या तरंगलांबींच्या प्रकाशाचा वापर केला जातो. प्रत्येक प्रकाशाची उपचारात्मक भूमिका वेगळी आहे. निळ्या प्रकाशाचा मुख्यतः मुरुमांसाठी वापर केला जातो, तर लाल प्रकाश त्वचेचे पुनरुज्जीवन आणि त्वचेची पुनर्प्राप्ती यासाठी उपयुक्त ठरतो. निअर-इन्फ्रारेड प्रकाश त्वचेच्या अधिक खोल थरांपर्यंत पोहोचतो आणि वेदना व्यवस्थापन तसेच रिकव्हरी प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो.
या थेरपीच्या सुरुवातीबाबत बोलताना Aesthetics Medispaच्या डॉ. शीतल जालोरी, (Designation), म्हणाल्या: “LED थेरपीचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्याच्या विविध उपयोगांबाबत आता अधिक स्पष्टता निर्माण झाली असून, योग्य रुग्णांमध्ये आणि विशिष्ट परिस्थितीत ही थेरपी विचारात घेतली जाऊ शकते. मात्र, योग्य उपचारासाठी नेमकी समस्या ओळखणे आणि थेरपीचा योग्य पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः नॉन-इन्व्हेसिव्ह उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारयोजनेतील एक उपयुक्त अतिरिक्त पर्याय ठरू शकते.”
Aesthetics Medispa येथे या थेरपीचा वापर मुरुम आणि त्वचेच्या पुनरुज्जीवनासाठी निवडक रुग्णांमध्ये केला जात आहे. तसेच chemical peels, microneedling आणि radiofrequency यांसारख्या प्रक्रियांनंतर त्वचेची पुनर्प्राप्ती जलद आणि अधिक प्रभावीपणे होण्यासाठीही तिचा वापर केला जातो. रुग्णाच्या क्लिनिकल गरजेनुसार वेदना व्यवस्थापनासाठीही ही थेरपी पूरक उपचार म्हणून वापरली जात आहे.
“Chemical peels किंवा microneedling यांसारख्या प्रक्रियांनंतर त्वचेची रिकव्हरी हा उपचाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. योग्य रुग्णांमध्ये LED थेरपी या प्रक्रियेला आधार देण्यासाठी वापरता येऊ शकते. त्याचप्रमाणे, मुरुमांच्या समस्येतही रुग्णाची त्वचेची स्थिती आणि गरज लक्षात घेऊन इतर उपचारांसोबत LED थेरपीचा विचार केला जाऊ शकतो,” असे डॉ. जालोरी यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या: “ही थेरपी संपूर्ण उपचारयोजनेचा एक भाग म्हणून वापरण्याचा उद्देश आहे; प्रस्थापित वैद्यकीय उपचारांना पर्याय म्हणून नव्हे. प्रत्येक रुग्णाची गरज वेगळी असते आणि प्रत्येकासाठी एकच उपचार प्रभावी ठरेल असेही नाही. LED थेरपी योग्य आहे की नाही, हे ठरवण्यापूर्वी रुग्णाचे योग्य मूल्यमापन करणे आवश्यक आहे. रुग्णाची समस्या आणि त्याच्या एकूण उपचारयोजनेनुसार, निवडक प्रकरणांमध्ये ही थेरपी अतिरिक्त उपचार म्हणून वापरली जाऊ शकते.”
Comments
Post a Comment