दलित पँथर ५४ वा वर्धापन दिना निमित्त पुण्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
. यावेळी बोलताना यशवंत म्हणाले की, १९७२ साली अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरुद्ध विद्रोहाची मशाल पेटवणाऱ्या दलित पँथर या लढाऊ चळवळीचा ५४ वा वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत.
या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .
या कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूरे यांचा भव्य नागरी सत्कार पुणेकरांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पॅंथर रत्न पुरस्काराने पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे वाहतूक विभाग उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पुणे वाहतूक विभाग सह आयुक्त मनोज पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे आदी 54 सन्माननीय मान्यवरांना पॅंथरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.याबरोबरच देऊळबंद 2 चित्रपटाचे अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे व अभिनेते रमेश परदेशी यांचाही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर नागरिक सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे जाज्वल्य व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले आहे.त्याचबरोबर यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर तरी पुणेकरांनी व पॅंथर प्रेमींनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे
Comments
Post a Comment