तेरावा गोवा लघुपट महोत्सव 25 ऑक्टोबर रोजी
पुणे दिनांक (प्रतिनिधी) _ नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञासाठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे यंदा तेरावे वर्ष आहे.
सारसबागे जवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील सभागृहामध्ये 25 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये विविध देशातील शंभरहून अधिक लघुपट या महोत्सवांमध्ये दाखवण्यात येणार आहेत .हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
ज्येष्ठ लेखक, संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार विनायक कुलकर्णी ,ज्येष्ठ चित्रपट समीक्षक कल्पना खरे ,ज्येष्ठ लेखक दिलीप कुकडे आणि पत्रकार मनोहर सप्रे यांच्या हस्ते महोत्सवातील विविध विभागातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या विविध लघुपटापैकी सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा 35 विभागांमध्ये पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या लघुपटांच्या निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. विविध लघुपट दिग्दर्शक निर्माते आणि तंत्रज्ञ या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.या तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद, चर्चासत्र आदी विविध कार्यक्रमही महोत्सवामध्ये घेण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment