पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र साहेबराव वाघमारे यांच्या चित्र शिल्प कलाकृतींचे स्वयंभू या शीर्षाचे दुसरे एकल चित्र शिल्प प्रदर्शन पुण्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

एकल चित्र शिल्प प्रदर्शनाचे पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे 7 जून 2026 ते 9 जून 2026 पर्यंत आयोजन*
पुणे -पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र साहेबराव वाघमारे यांच्या चित्र शिल्प कलाकृतींचे स्वयंभू या शिर्षाचे दुसरे एकल चित्र शिल्प प्रदर्शन पुण्यात सात जून 2026 ते 9 जून 2026 पर्यंत पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 11:30 ते रात्री 7:30 वाजेपर्यंत विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे. या स्वयंभू एकल चित्र शिल्पाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोहिनूर ग्रुपचे व खडकी शिक्षण संस्थेचे कृष्णकुमार गोयल, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रकाश मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार महेंद्र वाघमारे, श्रीजीत वाघमारे,कुशल वाघमारे उपस्थित होते. या प्रदर्शनास प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी व प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रदर्शनास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर भेट देणार आहेत.या प्रदर्शनास चित्र व शिल्प प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे प्रदर्शन 7 जून 2026 ते 9 जून 2026 या दरम्यान सकाळी 11:30 ते 7:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहेत तरी या प्रदर्शनास अवश्य पुणेकर नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो मध्ये डॉक्टर्स कडून महिला आरोग्य विषयक जनजागृती