मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव २०२६ मध्ये ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
*मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव २०२६ मध्ये ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन*
पुणे -मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या वतीने दि. ०८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२६ निमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळीया परिषदेस मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे संयुक्त जयंती महोत्सव समिती तर्फे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रा. डॉ.वृषाली रणधीर,नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्रा.प्रमोद शिंदे,प्रा. डॉ. जयंत साळवे, प्रा. डॉ.हनुमंत लोखंडे,प्रा. डॉ. विठ्ठल बोरकर,प्रा. नम्रता जहागीरदार, प्रा. स्वप्नील जोशी आदी उपस्थित होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा व्यापक जागर घडवून आणण्याच्या उद्देशाने व्याख्यानपर सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, शोधनिबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांसारख्या कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास, सामाजिक जाणीव व मूल्याधिष्ठित विचारसरणी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या महोत्सवाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
दि. ८, ९ व १० एप्रिल २०२६ - पुस्तक प्रदर्शन व विक्री (स्थळ : नेव्हिल वाडिया हॉल, पुणे.)
दि. ०९ एप्रिल २०२६ – ‘मी सत्यशोधक जोतीराव फुले बोलतोय’ ( एकपात्री प्रयोग ) – श्री. कुमार आहेर
दि. ५ ते १० एप्रिल २०२६ - शोधनिबंध स्पर्धा – विषय खालीलप्रमाणे :
1. शिव-शाहू-फुले-आंबेडकर : वर्तमानाचे दीपस्तंभ / Shiv- Shahu- Phule- Ambedkar: Lighthouse to the Present Time
2. फुले-आंबेडकरी विचारधारा आणि समकालीन महत्व / Phule–Ambedkarite Ideology and it's Relevance today
3. महात्मा जोतीराव फुले आणि उद्योजकता / Mahatma Jotirao Phule and Entrepreneurship
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जलनीती / Dr. Babasaheb Ambedkar and Water Management
5. डॉ. आंबेडकर - एक मानववंशशास्त्रज्ञ / Dr. Ambedkar, an Anthropologist
दि.१० एप्रिल २०२६ - वक्तृत्व स्पर्धा – विषय खालीलप्रमाणे :
१. मुलींची पहिली शाळा ते डिजिटल साक्षरता : महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांची प्रासंगिकता
२. संवैधानिक नैतिकता : २१ व्या शतकातील सामाजिक आव्हानांवर डॉ. आंबेडकरांचे वैचारिक कवच
३. शिव-शाहू-फुले-आंबेडकर : सर्वसमावेशक समाजाचे प्रणेते
सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल.
इतर कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता नेव्हिल वाडिया महाविद्यालय सभागृह येथे उद्घाटन समारंभ पार पडणार असून यावेळी मा. डॉ. शैलेन्द्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता ‘सत्यशोधक’ हा महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तायडे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत ग्रंथालय, नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथे सलग १२ तास वाचन उपक्रम होणार आहे.
सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी १०:३० वा. डॉ. श्रुती तांबे यांचे व्याख्यान असणार आहे.
दुपारी ०२.०० वा. शाहीर मा. चरण जाधव यांचे ‘आंबेडकरी शाहिरी जलस्याचे’ आयोजन टाटा असेम्ब्ली सभागृह, नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथे केले आहे.
मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत महाविद्यालयाच्या आवारात ‘भव्य समता रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. तसेच सकाळी ११:३० मा. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे व्याख्यानपर सत्र नेव्हिल वाडिया महाविद्यालय सभागृह येथे होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा उद्देश महान व्यक्तिमत्त्वांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे तसेच समता, बंधुता आणि ज्ञान यांचे मूल्य दृढ करणे हा आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त जयंती महोत्सव समिती, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे च्या नवरोजी वाडिया महाविद्यालय, कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय, नेव्हील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वाडिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संस्थांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment