शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळा
पुणे, ३० जुलै २०२५ - शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व 'ज्ञानपर्व' या विशेषांकाचे प्रकाशनन करण्यात आले. हा कार्यक्रम सिंबोयसिस विश्वभवन हॉल, सेनापती बापट रोड, छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथे घेण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिती - सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र; शाहू छत्रपती महाराज खासदार, कोल्हापूर; अभिजीत पवार व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह; सम्राट फडणीस, संपादक, सकाळ माध्यम समूह; प्रशांत नादनवरे; अंकित काणे; संजीवनी मुजुमदार; डॉ. स्वाती. एस. मुजुमदार,प्रधान संचालक, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी; डॉ. विद्या येरवडेकर,प्रधान संचालक, सिंबायोसिस हे उपस्थित होते. स्वागत पर भाषणात सम्राट फडणीस म्हणाले," डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा प्रवास एक पर्वच म्हणावा लागेल, एक व्यक्ती आणि संस्थेची एकरूपता हि डॉ. मुजुमदार सरांमध्ये अनोखी आहे, "वसुधैव कुटुंबकम" हि संकल्पना त्यांनी जगत खुपच उत्तम र...