डीपीईएस मध्ये फुटबॉल स्पर्धा संपन्न

पुणे: डीपीईएस संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टर्फ येथे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. 

संस्थेच्या सचिव उमा ढोले पाटील, संचालक रौनक ढोले पाटील आणि माध्यमिक विभागाचे वरिष्ठ शिक्षण अधिकारी सुनंदा वखारे यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न घेतले.
 प्रशालेत अधिकाधिक खेळाडू आपल्या कौशल्यासह विकसित व्हावेत यासाठी सागर ढोले पाटील आणि संचालक मंडळाकडून अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत. त्याचे फळ म्हणून या शाळेतून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होत आहेत. 

जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी देखील शाळेच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न