शहीद पंतप्रधान’ इंदीराजींच्या हत्येवर, ‘त्यांच्या कारकिर्दीच्या दिवसांची’ तुलना मोदीं च्या दिवसांशी करणे.. बौध्दीक दिवाळखोरी व विकृतीचे प्रदर्शन..! - काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे दि.२६ जुलै पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान पदाची सु ४०७८ दिवसांची कारकीर्द पुर्ण केल्याने, भाजप मुखपत्रातुन’ वाहवा करण्यात येत असून ‘शहीद पंतप्रधान’ इंदीराजींच्या हत्येवर, ‘त्यांच्या कारकिर्दीच्या दिवसांची’ तुलना पंतप्रघान मोदींच्या दिवसांशी करणे हे बौध्दीक दिवाळखोरी व विकृतीचे प्रदर्शन असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, शहीद पंतप्रधान श्रीमती इंदीराजी गांधी यांच्या धोरणात्मक दृष्टीकोनांची व राजकीय मुत्सद्देगिरीच्या निर्णयांची तुलना मोदींच्या निर्णयांशी देखील होऊ शकत नसल्याची वास्तवता आहे तरी देखील काही वाहीन्यांनी प्रयत्न देखील केला परंतू तेथे ही ‘निर्णय, धोरणे व साध्य केलेल्या कामाचे बाबतीत’ मोदी कुठेही सरस ठरू शकले नाहीत.
मात्र हत्त्या झाल्या मुळे शहीद झालेल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीचा “कालावधी दिवस” मोदींनी मोडून काढल्याचे तुणतुणे भाजप नेते वाजवत असल्याने, राजकीय चढाओढीची उंची ‘कारकीर्दीच्या दिवसांच्या संख्येवरून गाठल्याचा’ तोरा मिरवणारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करीत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्या देशाच्या प्रधानमंत्री म्हणून कार्यरत होत्या. मात्र जर कदाचित श्रीमती इंदीराजी गांधी यांची तेव्हा दुर्दैवी हत्या झालीच् नसती तर त्यांनी पं. नेहरूंचे १७ वर्षांच्या कालावधीचे रेकॅार्ड मोडले असते व देश तेंव्हाच महासत्ता बनला असता ही देखील तेवढीच सत्य वास्तवता असल्याचे प्रतिपादन गोपाळदादा तिवारी यांनी केले.
श्रीमती इंदीराजींच्या कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ, सॅटेलाईट द्वारे प्रगती साधुन देशाने उत्पादन व संरक्षणाच्या बाबतीत मोठा पल्ला गाठला होता.. पंतप्रधान मोदी ज्या दुर्गदर्शन व आकाशवाणी वरुन 'मन की बात' करतात त्यांचे श्रेय स्व. इंदीराजींनाच जाते अशी पुस्ती ही गोपाळदादा तिवारी यांनी जोडली.
शहीद पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी गेले तेव्हा कोणी व्यक्ती नव्हे तर देशाचे ‘विद्यमान पंतप्रधान’ गेले होते आणि देश रडला होता त्यामुळे त्यांचे कालावधीचे दिवस मोजणे हे अनैसर्गिक कृती होय..!
Comments
Post a Comment