"साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५" ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण खोरे यांना जाहीर



पुणे :  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

"साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५"  हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी, पुणे येथे प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र व रोख रु. ११०००/- असे आहे. याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पूर्वी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, परिवर्तनवादी चळवळीतील नेते, साहित्यिक आणि अधिकारी यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये अंकल सोनवणे, रमेश राक्षे, प्रा. सुकुमार कांबळे, शाहीर दीनानाथ साठे,  वाल्मीक अवघडे, दत्ता शेंडगे, सदाशिव वाघमारे, वसंत वाघमारे, श्रीमती शुभा अंगीर तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले होते.

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे गेली ४७ वर्षे लेखक आणि संपादक, पत्रकार म्हणून काम करीत आहेत.  सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात आदि दैनिकांमध्ये त्यांनी संपादक पदावर कार्य केले आहे. तर लोकसत्ता, पुण्यनगरी मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.   'पोरके दिवस' हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय असून दोन युरोप, इंदिरा प्रियदर्शनी, मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.  सामाजिक प्रश्न, समाजातील वंचित, दलीत, अपंग, कष्टकरी महिला यांचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत .महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, दलित आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यावर त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय गांधीजींची पुनर्भेट.  दिव्यांग आणि आपण. महाड सत्याग्रह - ९० वें स्मरण वर्ष विशेषांक. महाराष्ट्र - विकासाचे नवे प्रवाह. लोकशाहीला बळ देणाऱ्या विचारधारा विशेषांक. दलित उद्योजकता विशेषांक. गांधीजींचे प्रेरणादायी विचार- मराठी आणि इंग्रजी . कृतिशील परिवर्तनवादी शरद पवार. दलित साहित्याच्या शोधात. महाड सत्याग्रह: ९० वे स्मरणवर्ष - मार्च २०१७. लोकसभा निवडणूक विशेषांक २०१९. विधानसभा निवडणूक विशेषांक २०१९. महाराष्ट्र- विकासाचे नवे प्रवाह. महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरण अंक आदि ग्रंथ आणि विशेषांकाचे संपादन , लेखन अरुण खोरे यांनी केले केले आहे.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न