तामिळ वेल्फेअर असोसिएशन पुणे* तर्फे तामिळ नवीन वर्षाच्या आनंदोत्सवानिमित्त सुमधुर गीतांच्या,नृत्यांच्या व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न

पुणे -तामिळ वेल्फेअर असोसिएशन पुणे तर्फे तामिळ नवीन वर्षानिमित्त आनंदोत्सवानिमित्त सुमधुर  गीतांच्या,नृत्यांच्या व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट सी. एन. रविशंकर  उपस्थित होते. तसेच यावेळी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, वानवडी प्रभाग चे भा. जा. प.अध्यक्ष  महेश पुंडे व दिनेश होले,तामिळ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  अरविंद पिल्ले, सचिव संतोष कुमार, फोरसाईट महाविद्यालयाचे प्राचार्य  रवींद्र पिल्ले, . एन मूर्ती केसवाल, जीवन पिल्ले,शंकर पिल्ले,  श्याम पिल्ले, दिनेश पिल्ले विजयकुमार स्वामी राजेश पिल्ले, नारायण पिल्ले, नंद गोपाल पिल्ले, श्रीधरन पिल्ले, चंद्रशेखर पिल्ले संजीवनी मुनस्वामी, शर्मिला पिल्ले,  राणी मुनस्वामी  परिमला पिल्ले,जयश्री पिल्ले, विजयालक्ष्मी पिल्ले, श्रेयस पिल्ले  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध तामिळ भाषीकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तामिळ वेल्फेअर असोसिएशनचा मुख्य उद्देश पुण्यातील तामिळ भाषिकांना एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण होऊन सुखदुःखावेळी एकमेकांना मदत करणे हा हेतू आहे. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की  तामिळ नागरिकांमुळे महाराष्ट्राच्या दळणघडणीत मोठा वाटा आहे. 
यावेळी आनंदराज म्युझिकल ग्रुप  अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे  प्रसिद्ध तमिळ गीते हिंदी गीते व नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना शर्मिला पिल्ले यांची होती. या कार्यक्रमात गायक  कलाकार  हरीश दळवी, प्रमुख गायक जीवन पिल्ले, गंगा डाके, श्रीमती छाया अय्यर, सुंदरी अय्यर, कैलास गोरेल, .सतीश अय्यर,  अशितोष कोलेकर गायक गायिकांनी आपली बहारदार तमिळ, हिंदी व मराठी गीते  सादर केली. शिवानी पिल्ले व मयुरी स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लहान मुलींनी धमाकेदार डान्स केला. तसेच तमिळ गाण्यांवर  युवतींचे धमाकेदार डान्स पण झाले.  तामिळ  गाण्यांवर युवतीने धमाकेदार नृत्य केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना आनंदराज म्युझिकल ग्रुप अँड इव्हेंट मॅनेजमेंट जीवन पिल्ले व शर्मिला पिल्ले यांचे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तामिळ वेलफेर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अरविंद पिल्ले ह्यांनी केले.  जीवन पिल्ले व शर्मिला पिल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमास तामिळ  नागरिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझ्म फेस्टिव्हलजल्लोषात पार पडला