Posts

Showing posts from November, 2025

प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

Image
मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत आणि ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाका! या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांची मजबूत फळी. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे.  नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभव देईल.  रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.  भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित व रत्नाकर मतकरी लिखित ‘एकद...

भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर -‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर

Image
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.  ‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे. ‘व्...

केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे फीटल मेडिसिन विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित

Image
पुणे,29 नोव्हेंबर 2025 : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे फीटल मेडिसिन विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसूतीपूर्व निदान, गर्भावस्थेदरम्यान उपचार आणि एक विशेष उदयोन्मुख शाखेच्या रूपात फीटल मेडिसिनचे वाढते महत्त्व यावर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.     परिषदेमध्ये विविध तज्ञांनी लवकर निदान आणि उपचाराचे माता व बाळांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपली भूमिका मांडली. गर्भवाढीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या,जन्मजात विसंगती,अनुवंशिक विकार आणि प्लासेंटा (गर्भ वेष्टन) च्या कार्यात बिघाड अशा अनेक स्थितींचे निदान लवकर केले जाऊ शकते व त्यावर लक्ष्यित उपचार करत काही बाबतीत जन्माआधी जीवनदायी प्रक्रिया (फीटल प्रोसिजर्स) केले जाऊ शकतात.या राष्ट्रीय परिषदेमध्ये फीटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ञ डॉ.मणिकंदन कृष्णन, मेडिस्कॅन सिस्टिम्स डायग्नोस्टिक अल्ट्रासाऊंड,फीटल मेडिसिन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर,चेन्नई चे संचालक प्रा.डॉ.सुरेश सेषाद्री, प्रख्यात फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.एस.सुदर्शन, केईएम हॉस्पिटल पुणे च्या फीटल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.श्रीपाद कऱ्हाडे यांसह अनेक तज्ञांनी आ...

सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत लाँच झाला ‘उत्तर’चा ट्रेलर !

Image
सध्या 'आईला माहीत असतं!' या वाक्याने आणि 'हो आई!' या गाण्याने सगळीकडे चर्चेत असलेल्या 'उत्तर' या सिनेमाचा अप्रतिम ट्रेलर लॉन्च सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आणि सिनेमाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. आई आणि मुलाच्या नात्याची आजच्या काळातील गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या प्रसंगी काजोल आणि तनुजा यांनी प्रेक्षकांना 'आईसोबत' किंवा 'आईसाठी' हा सिनेमा पाहण्याचं प्रेमळ आवाहन सुद्धा केलं.  उत्तर चित्रपटाच्या या ट्रेलरचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक आई आणि मुलाला लागू होतील असे खुमासदार संवाद. यासोबतीनेच सुंदर चित्रीकरण आणि साउंडवर केलेली विशेष मेहनत ह्या सगळ्यानेच सिनेमाच्या ट्रेलरचा परिणाम अतिशय गहिरा झाला आणि प्रत्येकाचं मन आईबद्दलच्या सुंदर भावनांनी भरून गेलेलं दिसलं. 'उत्तर'मध्ये रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्या...

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत

Image
शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. हेमंत ढोमे यांच्या पोस्टनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणखीच वाढली आहे.  सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेल्या आणि लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे श...

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !

Image
मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आकर्षक पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. पोस्टरकडे पाहाताच दोन वेगवेगळ्या देशात राहाणाऱ्या प्रेमिकांची छायाचित्रे नजरेत भरणारी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे फोनच्या हावभावातून संवाद साधताना दिसत असून त्या संवादांमागे काय दडलेलं आहे? लाँग डिस्टन्सचं नातं... कधी मनं जुळवणारं तर कधी मन पोखरणारं ? हा प्रश्न पोस्टर पाहाताच मनात घर करतो. दिग्दर्शक समीर हेमंत जोशी सांगतात, “‘मिस यू मिस्टर’ ही फक्त दोन शहरांची गोष्ट नाही, ती दोन मनांची आहे. वेळेत आणि राहाण्याच्या ठिकाणांमध्ये अंतर पडलं तर नातं दुरावतं की अधिक स्थिरावतं ? 'मिस यू मिस्टर' याच चढउतारांची गोष्ट आहे.''  चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही कथा प्रेक्षकांना अधिकच रिलेट होईल. या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासा...

भरत जाधव - महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार

Image
मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच नेमकं कारण काय ? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय? याचं उत्तर नाट्यरसिकांना नाटक पाहूनच मिळणार आहे.   हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे.  दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणतात, ‘’हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची वेगळी बाजू यातून प्रेक्षकांसमोर येईल.” निर्माते, अभिनेते भारत जाधव ...

आमिर खानला उत्कृष्टतेसाठी आर.के. लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Image
 काल 23 नोव्हेंबर 2025 रोजी गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित  ए . आर .  रहमान   लाईव्ह   कॉन्सर्ट  आणि  आर . के .  लक्ष्मण   अवॉर्ड   फॉर   एक्सलन्सचा   समारोप  अत्यंत यशस्वीरीत्या झाला.  बोमन   इराणी   यांनी   प्रदान   केलेला   हा   पहिला   पुरस्कार   आमिर   खान   यांनी   स्वीकारला . दोन्ही कलाकारांनी एकमेकांचे मनापासून कौतुक केले आणि दिग्गज व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संध्याकाळी  ए . आर .  रहमान   यांच्यासह   हरिहरन ,  चिन्मयी ,  सुखविंदर   सिंह ,  धनुष   आणि   नीती   मोहन   यांनी   अप्रतिम   संगीतमय   सादरीकरणे   केली , ज्यामुळे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. ...

१९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आशा'

Image
''बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि न...

शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Image
मराठी शाळांची घटती संख्या, खालावलेली पटसंख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाची कमी होत जाणारी आवड… या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा प्रचंड मनोरंजक असा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे यांचे विषय हे नेहमीच तुमच्या आमच्या घरातले असतात आणि म्हणूनच ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. त्यामुळे आता या चित्रपटात पुन्हा एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली शाळा आणि मग त्या काळातल्या सगळ्या आठवणी पाहायला मिळणार हे नक्की. हा चित्रपट प्रेक्षागृहात आपलं मनोरंजन करणार यावर या टीझरने शिक्कामोर्तब केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.  टीझरमध्ये दिसतेय की, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर सुरू होते ती, त्यांच्या शाळेतील आठवणींची, नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची नवी सफर. दिग्दर्शक हेमंत ...

‘कृष्ण वंदना’ – पुण्यातील एक भव्य भक्तीमय संध्या, प्रस्तुती: मुग्धा वीरा गोडसे

Image
’कृष्ण वंदना’ – भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांना आणि त्यांच्या दिव्य गुणांना समर्पित भक्तीमय संध्या – अभिनेत्री व आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे पुण्यात सादर करत आहेत. ही विशेष कीर्तन-संध्या प्रथमच पुण्यात 23 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत, कालाग्राम, पी. एल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथे आयोजित केली आहे. ‘कृष्ण वंदना’ हे मुग्धांचे पहिले भक्तिगीत असून त्याची रचना त्यांच्या पूज्य गुरु श्री ‘तर्नेव’ जी यांच्या कृपेने झाली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांवर आणि गुणांवर आधारित हे मौलिक गीत आता सर्व प्रमुख संगीत मंचांवर उपलब्ध आहे. संध्येची सुरुवात दिव्य मंत्रोच्चारणाने – ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ – होणार असून त्यानंतर ‘कृष्ण वंदना’चे सादरीकरण केले जाईल. अवीरास आणि समूह आपल्या मधुर भजनांनी व कीर्तनांनी भक्तिमय वातावरण निर्मिती करतील. तसेच प्रख्यात वंशीवादक पं. रवीशंकर मिश्र सुंदर रागांनी संध्येला आणखी सुमधुर स्पर्श देतील. कार्यक्रमादरम्यान ‘कृष्ण वंदना’ या पुस्तकाचीही प्रेक्षकांना भेट दिली जाईल. हे पुस्तक मुग्धांच्या आध्यात्मिक अनुभवांव...

ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आमिर खान यांना बोमन इराणी यांच्या हस्ते पहिला आर. के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

Image
पुणे शहर या ऐतिहासिक क्षणांना टिपण्यासाठी सज्ज झालेले आहे, कारण सुप्रसिद्ध संगीतकार– गायक ए.आर. रहमान 'गहुंजे' येथील एम. सी.ए स्टेडियममध्ये त्यांचा पहिलावहिला स्टेडियम कॉन्सर्ट घेऊन येत आहेत. ह्या कार्यक्रमात ए.आर. रहमान ह्यांच्या सोबतीला भारतातील सर्वश्रुत प्रतिष्ठित गायक- हरिहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी- ह्यांच्या गाण्यांचा रसिक प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे. ह्या कार्यक्रमात यावर्षीपासून सुरू होणारा "आर.के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार" चा पहिला मान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आमिर खान ह्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने नव्याने सुरू होणारा हा पुरस्कार म्हणजे, कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा केला जाणार गौरव असणार आहे. तसेच या पुरस्कारामुळे हे अधोरेखित होणार आहे की, आर के लक्ष्मण यांच्यासारखी सर्जनशीलता, जिद्द, चिकाटी ज्या, कलाकारांमध्ये असणार आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारामुळे लक्ष्मण यांचा सन्मान वर...

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा ‘मेरीकी -२०२५’ गुरुवारपासून

Image
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ‘मेरीकी २०२५’ या प्रतिष्ठित प्री-ग्रॅज्युएशन डिझाइन प्रदर्शनाचे ११वे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. हे त्रिदिवसीय प्रदर्शन २०, २१ व २२ नोव्हेंबर २०२५ रोजी कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे, सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत होणार आहे. या प्रदर्शनात बी.डिझाइन आणि एम. डिझाइनच्या ५०० पेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. ऍनिमेशन डिझाइन, फिल्म अ‍ॅन्ड व्हिडिओ डिझाइन, ग्राफिक डिझाइन, इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, युजर एक्स्पिरियन्स डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन डिझाइन, रिटेल अ‍ॅण्ड एक्झिबिशन डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, फॅशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग, इन्फॉर्मेशन डिझाइन अ‍ॅण्ड डेटा व्हिज्युअलायझेशन, इमर्सिव्ह मीडिया डिझाइन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप तसेच ऑटोमोटिव्ह क्ले स्कल्प्टिंग या विविध शाखांतील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायर...

माई समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात - कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन

Image
पुणे : “माईंना मी पहिल्यांदा नांदेड येथे भेटलो. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील त्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणाने मी अत्यंत प्रभावित झालो. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा मी सखोल अभ्यास केला. जीवनात अनेक अडचणी आणि संकटे असतानाही माईंनी कधीही नकारात्मकता अंगीकारली नाही. त्यांच्या कार्याच्या पाठीशी सकारात्मक विचारांची आणि अपार जिद्दीची अमूल्य शक्ती होती. त्यांनी अर्जुनाप्रमाणे ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःचे दुःख विसरून इतरांसाठी आयुष्य अर्पण केले. म्हणूनच त्या समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात,” असे प्रतिपादन अप्पर पोलीस महासंचालक फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख कृष्ण प्रकाश यांनी केले. 'सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, मांजरी तर्फे पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या वाढदिवस व बालदिनाच्या औचित्याने ‘माई दिनदर्शिका-2026’ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्ण प्रकाश बोलत होते. कार्यक्रमास मनिष कासोदेकर (लेटर्स अँड स्पिरिट आर्ट क्लब), ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता...