ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आमिर खान यांना बोमन इराणी यांच्या हस्ते पहिला आर. के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
पुणे शहर या ऐतिहासिक क्षणांना टिपण्यासाठी सज्ज झालेले आहे, कारण सुप्रसिद्ध संगीतकार– गायक ए.आर. रहमान 'गहुंजे' येथील एम. सी.ए स्टेडियममध्ये त्यांचा पहिलावहिला स्टेडियम कॉन्सर्ट घेऊन येत आहेत.
ह्या कार्यक्रमात ए.आर. रहमान ह्यांच्या सोबतीला भारतातील सर्वश्रुत प्रतिष्ठित गायक- हरिहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी- ह्यांच्या गाण्यांचा रसिक प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.
ह्या कार्यक्रमात यावर्षीपासून सुरू होणारा "आर.के. लक्ष्मण गौरवास्पद कामगिरी पुरस्कार" चा पहिला मान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आमिर खान ह्यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.
आर. के. लक्ष्मण यांच्या नावाने नव्याने सुरू होणारा हा पुरस्कार म्हणजे, कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा केला जाणार गौरव असणार आहे.
तसेच या पुरस्कारामुळे हे अधोरेखित होणार आहे की, आर के लक्ष्मण यांच्यासारखी सर्जनशीलता, जिद्द, चिकाटी ज्या, कलाकारांमध्ये असणार आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कारामुळे लक्ष्मण यांचा सन्मान वर्षागणिक वाढत राहणार आहे.
ह्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आर. के. लक्ष्मण ह्यांच्या कुटुंबाने केलेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला, संस्कृती आणि संगीत एकत्र येत आहेत.
कार्यक्रमाची माहिती
दिनांक, रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५
प्रवेश - दुपारी ३:०० वाजता
कार्यक्रम सुरु - संध्याकाळी ५:०० वाजता
स्थळ - एम सी ए स्टेडियम, गहुंजे, पुणे
Comments
Post a Comment