Posts

Showing posts from January, 2026

चित्रपट तयार करत रहा, यश मिळेल दिग्दर्शक डॅन वॉलमन यांचा नव्या दिग्दर्शकांना सल्ला

Image
पुणे, दि. १९ जानेवारी २०२६ : चित्रपट तयार करण्याचे काम कायम करत रहा, थांबू नका, यश मिळेल, असा सल्ला आज इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वॉलमन यांनी नव्या स्वतंत्र दिग्दर्शकांना दिला.  पुणे चित्रपट महोत्सवा(पिफ)त आज ‘कमी संसाधनांतून सर्जनशीलतेकडे - नव्या स्वतंत्र दिग्दर्शकांना सल्ला’, या विषयावर डॅन वॉलमन बोलत होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.  डॅन वॉलमन म्हणाले, “कायम करत रहा आणि चित्रपट तयार करत रहा. आपल्याला हवी तशी परिस्थिती तयार होईल, तेंव्हा चित्रपट तयार करू, असा विचार करत बसू नका. कमी खर्चाच्या कथा निवडा. कथा अशीच निवडा की ज्याच्यामध्ये लोकेशन आणि अभिनेत्यांवर जास्त खर्च होणार नाही आणि चित्रपट करण्यापूर्वी कालावधीचा विचार करा.” ते म्हणाले, “जगामध्ये युद्ध, हिंसा, द्वेष सुरू आहेत आणि त्यामुळे निराशा येऊ शकते. मला मात्र त्यातून निराश न होता जिवंत ठेवण्यासाठी सतत चित्रपट तयार करणे, गरजेचे असते.” ज्यांच्याकडे संसाधनांची कमी आहे, पण ज्यांना चित्रपट तयार करायचे आहेत, त्यांच्यासाठी बायबलमधील दोन शिकाऱ्यांचे उदाहरण देत ते म्हणाले, “थांबू नका. कमी ल...

डिजिटल व्यासपीठ आणि छोट्या महोत्सवात स्थानिक चित्रपटांना भविष्य - गोरान राडोवानोविच

Image
पुणे, दि. १८ जानेवारी २०२६ : मोठ्या चित्रपट महोत्सव आणि पुरस्काराच्या मागे लागण्यापेक्षा छोट्या स्थानिक प्रश्नांना घेऊन छोटे चित्रपट केल्यास त्याला भविष्य आहे. त्यावर विचार करा, असा सल्ला आज सर्बियाचे दिग्दर्शक गोरान राडोवानोविच यांनी प्रादेशिक चित्रपट दिग्दर्शकांना दिला. राडोवानोविच यांचे आज ‘प्रादेशिक चित्रपटांसाठी धडे‘ या विषयावर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्याख्यान झाले. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.  राडोवानोविच म्हणाले, “कोणत्याही मोठ्या विषयांच्या आणि मोठ्या खर्चिक चित्रपटांच्या मागे लागण्यापेक्षा स्थानिक आणि आपापल्या भागातील स्थानिक प्रश्न आणि कथा घेऊन छोटे चित्रपट तयार करा. त्याला भविष्य आहे. तुम्हाला आवडणाऱ्या आणि समाधान देणाऱ्या विषयांवर चित्रपट तयार करा. पुरस्काराच्या मागे लागू नका. मोठ्या चित्रपट महोत्सवाच्या मागे लागण्यापेक्षा छोटे कलात्मक चित्रपट महोत्सव आणि डिजिटल व्यासपीठ महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणी आपले चित्रपट घेऊन जा. छोट्या देशांमध्ये आपले चित्रपट घेऊन जा. स्वतःची व्यासपीठं तयार करा.” आता रशिया आणि ब्रिक्स देश चि...