जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५" यशस्वीरित्या संपन्न

पुणे : शहरात ३ दिवस चाललेला  "जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५" यशस्वीरित्या संपन्न झाला. देश-विदेशातून आलेल्या ५,००० हून अधिक अभ्यागतांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या भव्य आयोजनातून भारतीय अॅल्युमिनियम डाय कास्टिंग उद्योग जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय  मंत्री  सुरेश प्रभू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी लाइट वेट अलॉय, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन प्रक्रिया यांचे महत्व अधोरेखित केले. जागतिक पुरवठा साखळीतील बदल आणि भविष्यकालीन मोबिलिटीच्या गरजा लक्षात घेता भारतासाठी अॅल्युमिनियम व मॅग्नेशियम कास्टिंग क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मेगा इव्हेंटमध्ये डाय कास्टिंग मशिनरी उत्पादक, उपकरणे, तांत्रिक सोल्युशन्स पुरवठादारांचे २०० हून अधिक प्रदर्शन स्टॉल्स होते. यासोबतच तांत्रिक परिषद, बायर–सेलर मीट, सीईओ मीट, तरुणांसाठी क्विझ स्पर्धा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, तसेच मॅग्नेशियम कास्टिंगवरील स्वतंत्र तांत्रिक परिषद आयोजित करण्यात आली होती.

या व्यासपीठामुळे व्यवसायिक संपर्क, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण, नवीन भागीदारी, व्यवसाय संधी आणि रोजगार निर्मिती यांना मोठा चालना मिळाली.

हा भव्य कार्यक्रम जीडीसीटेक चे संस्थापक आर. टी. कुलकर्णी आणि अध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. यासाठी उपाध्यक्ष जितेंद्र लखोटिया व  राजेंद्र अपशंकर, सचिव अनिरुद्ध इनामदार आणि खजिनदार नितीन भागवत यांनी विशेष योगदान दिले.

जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५ च्या यशस्वी आयोजनामुळे भारतीय डाय कास्टिंग उद्योगासाठी जीडीसी टेक फोरमचे महत्व अधिक दृढ झाले आहे. उद्योगविकास, कौशल्यवृद्धी, निर्यात वाढ, रोजगार निर्मिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणे या दिशेने जीडीसी टेक फोरम सातत्याने कार्य करत असून भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ पणे दिसून आला अशी माहिती फोरम चे खजिनदार नितीन भागवत यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझ्म फेस्टिव्हलजल्लोषात पार पडला