Posts

Showing posts from December, 2025

२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव१५ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न होणारऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू , जागतिक चित्रपट स्पर्धेची यादी जाहीर

Image
पुणे, दि. १६ डिसेंबर २०२५ : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचे पिफ’चे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) यावेळी उपस्थित होते.  पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर– युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय- लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा १० स्क्रीनमध्ये हा महोत्सव होणार आहे. महोत्सवासाठी सर्वांसाठी कॅटलॉग फी ८०० रुपये असून, ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. स्पॉट रजिस्ट...

बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये' - रिंकू राजगुरूची 'आशा' १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

Image
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ ही प्रभावी आणि अर्थपूर्ण टॅगलाईन ट्रेलरची जाणीव अधिक ठळक करते. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील, वास्तववादी प्रवास ‘आशा’ या चित्रपटातून उलगडताना दिसतो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेली ‘आशा’ ही केवळ एक व्यक्तिरेखा न राहाता, ती अनेक स्त्रियांची प्रतीक ठरते. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारी आरोग्य सेविका, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणारी स्त्री, अन्यायाविरोधात ठाम उभी राहाणारी योद्धा आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी न थकता झगडणारी व्यक्ती. आशाचे हे सगळे पैलू ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतात. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. या चित्रपटातील ‘चालत रहा पुढे’ हे प्रेरणादायी गाणंही सध्या चर्चेत आहे. आशाच्या संघर्षाला ऊर्जा देणारं हे गाणं सोशल मीडियावर भरभरून दाद मिळवत असून अनेकांसाठी ते प्रेरणेचा सूर ठरत आहे. रिंकू राजगुरूसह या...

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित

Image
भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. या झलकितून चित्रपटाचा भव्य स्केल, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येतो. चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे व...

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ १० ते १४ डिसेंबर २०२५ पीआयईसीसी, मोशी ~ पुणे येथे

Image
भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 'किसान' दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे. या वर्षी प्रदर्शन ३० एकरावर विस्तारीत आहे. किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ३० एकरावर पसरलेल्या किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा सहभाग लाभला आहे. तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचाही सहभाग आहे.    यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली ...

जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५" यशस्वीरित्या संपन्न

Image
पुणे : शहरात ३ दिवस चाललेला  "जीडीसी टेक मेगा इव्हेंट २०२५" यशस्वीरित्या संपन्न झाला. देश-विदेशातून आलेल्या ५,००० हून अधिक अभ्यागतांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या भव्य आयोजनातून भारतीय अॅल्युमिनियम डाय कास्टिंग उद्योग जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय  मंत्री  सुरेश प्रभू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी लाइट वेट अलॉय, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन प्रक्रिया यांचे महत्व अधोरेखित केले. जागतिक पुरवठा साखळीतील बदल आणि भविष्यकालीन मोबिलिटीच्या गरजा लक्षात घेता भारतासाठी अॅल्युमिनियम व मॅग्नेशियम कास्टिंग क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या मेगा इव्हेंटमध्ये डाय कास्टिंग मशिनरी उत्पादक, उपकरणे, तांत्रिक सोल्युशन्स पुरवठादारांचे २०० हून अधिक प्रदर्शन स्टॉल्स होते. यासोबतच तांत्रिक परिषद, बायर–सेलर मीट, सीईओ मीट, तरुणांसाठी क्विझ स्पर्धा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, तसेच मॅग्नेशियम कास्टिंगवरील स्वतंत्र तांत्रिक परिषद आयोजित...

’शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

Image
मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाच्या तालमीबद्दल एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई–पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात. परंतु नाटकाची तालीम थेट हैदराबादला होतेय. हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. या अनोख्या निर्णयामागे कारणही तितकेच विशेष आहे. नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना नाटकावर परिणाम व्हायला नको,या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांनी या संदर्भात नाटकाचे अभिनेते व निर्माते भरत जाधव यांच्याशी चर्चा केली. नाटकाची गुणवत्ता अबाधित राहावी, तालीम सुरळीत व्हावी यासाठी भरत जाधव यांनी तात्काळ तयारी दाखवत, संपूर्ण टीमसह हैदराबादला तालीम करण्यास होण्यास होकार दिला. त्यामुळे आता नाटकाची टीम काही दिवसांपासून हैदराबादमध्येच मुक्काम करत आहे आणि तिथे अगदी जोरदार व शिस्तबद्ध तालीम सु...

मेडट्रॉनिक आणि सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल मध्ये सहयोगसिम्‍बायोसिस मेडट्रॉनिक एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटरचे उद्घाटन

Image
सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) ने आपली घटक संस्‍था सिम्‍बायोसिस सेंटर फॉर हेल्‍थ स्किल्‍स (एससीएचएस) च्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनी मेडट्रॉनिकसोबत धोरणात्‍मक सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत सिम्‍बायोसिस मेडट्रॉनिक एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर, 'द टेक्नोव्हर्स' चे उद्घाटन केले आहे. हे आघाडीचे प्रशिक्षण केंद्र आरोग्‍यसेवा शिक्षण, प्रशिक्षण आणि सराव प्रगत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर भारतातील अद्वितीय एकीकृत केंद्र आहे, ज्‍यामध्‍ये एकाच छताखाली प्रगत शस्‍त्रक्रिया प्रशिक्षण आणि कॅडेव्‍हर-आधारित शिक्षण मिळेल. हे अत्‍याधुनिक केंद्र प्रगत क्रॅनियल, स्‍पायनल व ऑर्थोपेडिक तंत्रज्ञानांसह ब्रेन व स्‍पायनल रोबोटिक्‍स, सर्जिकल नेव्हिगेशन सिस्‍टम्‍स आणि ३डी इमेजिंगचा वापर करत अनुभवात्‍मक शिक्षण, नाविन्‍यता आणि प्रबळ शैक्षणिक-उद्योग सहयोगाप्रती त्‍यांची कटिबद्धता दर्शविते. हे एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर सातत्‍यपूर्ण शिक्षण परिसंस्‍था म्‍हणून डिझाइन करण्‍यात आले आहे, जे न्‍यूरोसर्जन्‍स, ऑर्थोपेडिक, स्‍पाइन व ई...

चित्रपटातील पिता–कन्या नाते सत्यात; प्राजक्ता गायकवाडचे कन्यादान वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांच्या हस्ते

Image
‘येसूबाई साहेब’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली. प्राजक्ताचा विवाह हडपसर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिषी यांच्या हस्ते तसेच निर्माते व कलाकार श्री पिंपळकर यांच्या हस्ते भावपूर्ण कन्यादान विधी पार पडला. यापूर्वी त्यांनी प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका काही चित्रपटांमध्ये साकारल्याने “चित्रपटातील नाते वास्तवात उतरण्याचा आनंद अवर्णनीय आहे” असे ते भावूक स्वरात म्हणाले. विधी दरम्यान श्री व सौ. पिंपळकर यांचे डोळे पाणावले. “काही नाती रक्ताच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्राजक्ताचे आई-वडील तसेच मामा-मामी यांनीही कन्यादान विधीत सहभाग घेतला. “प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभले,” असे सौ. अश्विनी पिंपळकर यांनी सांगितले. पारंपरिक वैदिक वातावरणात दिमाखदाररीत्या पार पडल...

मराठी शाळांची आठवणी जागे करणारे ‘शाळा मराठी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Image
मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी' असे म्हणत ‘द फोल्क आख्यान’ च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठी शाळेची ओळख, तिचे वातावरण, त्यातील आपुलकी, शिक्षकांचे प्रेम आणि शाळेच्या भिंतीतून मिळालेले संस्कार हे सर्वच या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जिवंत होते. रोहित जाधव यांच्या दमदार आवाजास हर्ष–विजय यांचे संगीत आणि गीतकार ईश्वर अंधारे यांच्या मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळतो. हे गाणं प्रत्येकाला नॉस्टॅलजिक करणारे आहे.  गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '''क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्य...

महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या विनम्र कुटुंबातील 18 नवदांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुण्यधाम आश्रमात आनंदात संपन्न।

Image
पुणे, 30 नोव्हेंबर 2025: पुण्यधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने यंदाही मनाला स्पर्श करणारा अनुभव दिला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 18 जोडप्यांनी, त्यापैकी 9 दृष्टिबाधित दांपत्यांनी, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी पूर्णतः निःशुल्क आणि विनादहेज आयोजित केलेल्या या सोहळ्यात एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाची सुरुवात केली. हा उपक्रम सलग 10व्या वर्षी साजरा होत असून, आजतागायत 165 हून अधिक विनम्र कुटुंबातील कन्यांचे विवाह येथे थाटामाटात पार पडले आहेत। लगभग 2500 हून अधिक उपस्थितीमुळे पुण्यधाम परिसर आनंद, उत्साह आणि शुभेच्छांनी दुमदुमून गेला. लग्नाच्या तयारीची धावपळ, शहनाईचे मंगल निनाद, फुलांची आकर्षक सजावट आणि सर्वत्र सणासुदीचे वातावरण पाहुण्यांच्या मनाला भावून गेले। स्वर्ण-लाल साड्यांमध्ये दिमाखात सजलेल्या वधू आणि शेरवानी, फेटे व मोजडीमध्ये रुबाबदार दिसणाऱ्या वरांची बारात उत्साहात नाचत सोहळा स्थळी दाखल झाली। सुंदर सजवलेल्या मंडपात वर-वधू स्थिरावल्यानंतर विद्वान पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये विवाहविधी आरंभ केला। पारं...

८० मराठी सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी

Image
डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन डोंबिवलीकर संस्थेने केले आहे. हा उपक्रम संपादक, आमदार रविंद्र चव्हाण, (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. यंदाच्या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या ८ दिग्गज महानुभावांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले संघ असून त्याचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या टीममध्ये नुपूर दुधवाडकर, वरद चव्हाण, ऋषिकेश पाटील, तेजस बर्वे, सुप्रीत कदम, शिव ठाकरे, ऋतुजा लिमये, ऋतुजा कुलकर्णी आहेत तर दुसरा भालजी पेंढारकर संघ आहे. त्याचा कॅप्टन हार्दिक जोशी असून त्याच्या टीममध्ये ऋतुराज फडके, आकाश पेंढारकर, अमोल नाईक, नचिक...

माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती -ब्रम्हर्षी गुरुदेव

Image
पुणे : जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी तर येणारच पण याच अडचणीच तुमची शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले. विश्व धर्म चेतना मंच, पुना, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने पुण्यात आयोजित ‘सिद्धि साधना का महाआशीर्वाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. तब्बल ६८ दिवसांच्या अग्नि महासाधने नंतर ब्रम्हर्षी गुरुदेवांनी उपस्थित भक्तांना जीवनमूल्यांची सखोल शिकवण दिली. यावेळी मंचचे राज्याध्यक्ष उत्तम बाठीया, आयोजक सुमित चंगेडीया,प्रायोजक महावीर बाठीया, प्रितेश कटारिया, संतोष लगडे, राहुल बोगावत ,स्वप्निल गांधी ,भावेश चोरड़िया आदी मान्यवर उपस्थित होते. कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत ब्रम्हर्षी गुरुदेव म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कौटुंबिक संवाद कमी होत असून कौटुंबिक मूल्ये हरवत चालली आहेत. घरातील संवाद वाढवा. रागासोबत प्रेमही व्यक्त करा. चेहऱ्यावरचे हास्य ही देवाची...

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Image
पुणे : अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2025,ट्विन फाउंटन,गोवा येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार आणि एमडी देसाई वायुसेना व सामाजिक कार्यकर्ते मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची ही अधिकृत दखल मानली जात आहे. प्रा. गायकवाड हे सलग वीस वर्षे प्राचार्य पदावर कार्यरत असून, शैक्षणिक व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षक नेतृत्व या क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला आहे. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.संत साहित्यातील अभ्यासक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख असून, ‘संत तुकाराम महाराजांचे अभंगातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर...