बालाजी टेलिफिल्म्सतर्फे ‘kutting’ – कुटुंबासाठी खास डिजिटल ॲप लाँच
मनोरंजनाचा ताजा आणि दमदार अनुभव आता एका क्लिकवर!
पुणे १५ सप्टेंबर २०२५ - बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडने भारतीय प्रेक्षकांसाठी एक नवं डिजिटल पाऊल उचलत कटिंग अँप - ‘Kutingg’ या कुटुंबाभिमुख ॲपची घोषणा केली आहे. आधुनिक प्रेक्षकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन “फॅमिली फर्स्ट” या संकल्पनेवर आधारित आहे. या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी दर्जेदार, आकर्षक आणि नवनवीन स्वरूपाचं मनोरंजन उपलब्ध होणार आहे.
कटिंग अँप ‘Kutingg’वर प्रेक्षकांना दमदार कथा, ताज्या मालिका, रिॲलिटी शोज, टॉक शोज, शॉर्ट व्हिडिओज, लोकप्रिय सिनेमे तसेच बिंज-वॉचिंगसाठी मुबलक कंटेंट अनुभवायला मिळणार आहे. मोबाईल-फर्स्ट प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या व्हर्टिकल व्हिडिओ फॉरमॅट्समुळे प्रेक्षकांना अधिक रंगतदार आणि वैविध्यपूर्ण अनुभव मिळेल. विविध श्रेण्यांमधील कार्यक्रमांमध्ये डेली डोस ऑफ एंटरटेनमेंट (प्यार की राहें, सास, बहू और स्वाद), वीकेंड बिंज (Cheerleader), सुपरस्टार लायब्ररी (Bose, Mentalhood) आणि नॉन-फिक्शन / चॅट शोज (स्वाद से करेंगे सबका स्वागत, Morning Mantra, Bollywood Gapshap आणि इतर) यांचा समावेश आहे. शो-रिल लिंक येथे उपलब्ध आहे.
या लाँचबाबत बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचे ग्रुप सीईओ आणि सीएफओ श्री. संजय द्विवेदी म्हणाले की, “आजचे प्रेक्षक लहान आणि वैयक्तिक कथा शोधतात. ‘kutingg’ हे त्याचं उत्तर आहे. हे केवळ ॲप नाही, तर कुटुंबांना एकत्र आणणारं डिजिटल ठिकाण आहे. आमचं उद्दिष्ट आहे अशा कथा देणं ज्या आनंद देतील, संवाद निर्माण करतील आणि प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील.”
ग्रुप चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री. नितीन बर्मन यांनी सांगितले की, “कटिंग अँप - Kutingg हे कंटेंट, क्रिएटर्स आणि प्रेक्षक यांना जोडणारं एक नवं इकोसिस्टम आहे. यातून केवळ कुटुंबीय मनोरंजनच नव्हे तर ब्रँड्स आणि पार्टनर्ससाठीही नवे संधीचे मार्ग खुलं होत आहेत. आमची दृष्टी आहे की kutingg भारताचं सर्वात विश्वासार्ह ‘फॅमिली-फर्स्ट’डिजिटल डेस्टिनेशन ठरावं.”
कटिंग अँप (kutingg) सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार असून, भारताच्या OTT जगतातील एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.
Comments
Post a Comment