जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझ्म फेस्टिव्हलजल्लोषात पार पडला
World Travel and Tourism Carnival 2025 8 फेब्रुवारी २०२५ रोजी IIBM group of Institute च्या पिंपरी येथील जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये जल्लोषात पार पडला. या कार्निवल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि जगातील पर्यटन स्थळांची प्रतिकृती पालकांना व विद्यार्थ्यांना बघायला मिळाली.या कार्निवलच उद्घाटन नगरसेविका मीनल यादव, वैशाली काळभोर आणि केंब्रीज ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना Jet India संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वस्तानी म्हणाल्या "या कार्निवलचा मूळ उद्देश जगाती वेगवेगळे देश व प्रेक्षणीय स्थळ जी अजून विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती नाहीयेत या कार्निवल मुळे माहित नसलेले पर्यटन स्थळ विद्यार्थ्यांना व पालकांना माहीत झाली.
त्यापुढे बोलताना म्हणाल्या हा कार्निवल आम्ही गेले सोळा वर्ष करत आहोत यावर्षी चाळीसहून अधिक कॉलेजेस चे प्रिन्सिपल आणि टीचर्स यांनी या कारणीवला भेट दिली.
केंब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर
म्हणाले सध्या सर्विस इंडस्ट्री मध्ये खूप जास्त संधी उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळात त्या अजून वाढणार आहेत. जेट इंडिया संस्थेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तयार होत आहेत. जेट इंडियाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खूप उज्वल आहे.
Comments
Post a Comment