जॉयलुक्कासच्या दि हार्ट ऑफ एव्हरी सेलिबरेशनचा बंपर प्राइज विजेता झाल्या जाहीर- मिळाली नवीकोरी थार SUV!
पुणे- ११ जानेवारी २०२५: प्रचंड प्रतिक्षेत असलेला जॉयलुक्कासचा अंतिरिम महोत्सव म्हणजेच दि हार्ट ऑफ एव्हरी सेलिबरेशनचा एक उत्सुकता संपन्न असा लकी ड्रॉ समारंभ आज जॉयलुक्कासच्या पिंपरी येथील शोरूम मध्ये पार पडला.
या प्रतिक्षेत भर घालत असताना आणि हा लकी ड्रा अधिक उत्सुकतासंपन्न बनविण्यासाठी विजेत्यास नवीकोरी थार SUV मिळणार असल्याने टाळ्यांच्या गजरात जाहीर झाले आहे.
पुणे व पिंपरीतील जॉयलुक्कासच्या एक्सक्लूसिव म्हणजेच दि ‘ हार्ट ऑफ एव्हरी सेलिबरेशन ’ चे मुख्य आकर्षण असलेल्या लकी ड्रॉ चा कालावधी हा १३ ऑक्टोंबर ते ३१st डिसेंबर पर्यंत होता. डेक्कन व पिंपरी येथील शोरूम मधून ज्या ग्राहकांनी रुपये १०,०००/- हून अधिक खरेदी केली होती ते या लकी ड्रॉ चे शानदार बक्षीस जिंकण्यास पात्र ठरणार होते. अलंकार प्रेमी पुणे व पिंपरीकरांनी हजारोंच्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला होता.
श्री. जॉय अलुक्कास (जॉयलुक्कास समूहाचे चेअरमन आणि एम डी) यांनी ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, "आमच्या दि हार्ट ऑफ एव्हरी सेलिबरेशनचा मोहिमेतील प्रचंड सहभागामुळे आम्हाला आनंद होत आहे. हा कार्यक्रम आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि प्रेमाबद्दल आभार मानण्याचा आमचा मार्ग होता. दागिने नेहमीच शुभ आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात आणि म्हणूनच या बंपर बक्षीस लकी ड्रॉ च्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आणखी चमक आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."
पिंपरी येथील शोरूम मधील हा भव्य कार्यक्रम जॉयलुक्कासचे वरिष्ठ व्यवस्थापक, निष्ठावान ग्राहक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
Comments
Post a Comment