स्वराज्य पक्ष पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात घडवणार परिवर्तन.
पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात घडेल परिवर्तन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी व्यक्त केला विश्वास...
आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले पुरंदर हवेली मतदारसंघात नक्की परिवर्तन घडेल त्यांनी भविष्यात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात कोणत्या प्रकारची विकास कामे करणार याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. मतदारसंघात कसलीही विकासकामे झाली नाहीत आम्ही शिवकालीन पद्धतीचा अवलंब करून मतदारसंघात वेगवेगळ्या भागात विकासाचे काम करणार असे त्यांनी यावेळी सांगितले.पुरंदर आणि हवेली तालुक्यातून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत असून हवेली तालुक्यातून मला चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष्याचे उमेदवार सूरज घोरपडे यांनी नागरिकांना मला मतदान करण्याचे आवाहन केले तसेच यावेळी निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा कायापालट नक्की करेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment