कोल्हापूरच्या कलाकारांचा चित्रपट ‘ह्या गोष्टीला नावच नाही’

आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्ट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच  जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहतायेत.  'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण.. त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती  भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण  भूमिका आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे.  ८ नोव्हेंबरला  हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

या  चित्रपटाचा  टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या  टिझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची  झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. इचलकरंजी तसेच  तिथल्या  डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी संस्थेत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर ,सांगली आणि गणेशवाडीचे  विशेष  सहकार्य या चित्रपटासाठी  लाभले आहे. 

नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी  खूप म्हत्त्वाचा असल्याचं  जयदीप  सांगतो.  डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट  सर्वांना लढण्याचं बळ निश्चितचं  देईल. 

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगतपाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी  सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.पायोस  मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर  निर्मित  ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे.साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचेआहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाशजाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंगमिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

*८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.*

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

नवरदेवाने लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी उचलेले 'हे' टोकाचे पाऊल; 'अंतरपाट' १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार