पाणीपुरी चित्रपटात सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी रंगणार

‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही  कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका  घरातील  सासू आणि जावई  यांच्यातील  धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्याला पहायला मिळणार आहेत. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. 

‘पाणीपुरी’ चित्रपटात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी चिवट सासू रंगवली आहे. तिचा आणि जावयाचा कलगीतुरा सतत सुरु असतो. सासू आणि जावई यांच्या जुगलबंदीत काय होतं? याची धमाल गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. धमाल कथानक, उत्तम स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल असा विश्वास  या दोघांनी  व्यक्त केला. 

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.  गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत. 

*मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.*

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

नवरदेवाने लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी उचलेले 'हे' टोकाचे पाऊल; 'अंतरपाट' १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार