कोल्हापूरच्या कलाकारांचा चित्रपट ‘ह्या गोष्टीला नावच नाही’
आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्ट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहतायेत. 'सर्जनशाळा' आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण.. त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या टिझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्...