ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्यावतीने डिजिटल मीडिया कार्यशाळा
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्यावतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन कर्वेनगर येथील सीएमए भवन येथे करण्यात आले होते. कार्यशाळेचा समारोप चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आयोजक हेमंत जाधव, समीर देसाई, सिद्धार्थ भोकरे, उल्का मोकासदार, रवी ननावरे, दुर्गेश बामणे, संतोष फुटक, समीर खांबे, संतोष वरक, सुभाष सुर्वे आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले होते.चं
द्रकांत पाटील म्हणाले, डिजिटल मीडियामधील अनेक चांगली चॅनेल्स सुरु आहेत, त्या रांगेत सर्वच यूट्यूब चॅनेल्स जाऊन बसतील का? हा विचार या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराने करायला हवा. सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था दवंडी ही होती. वर्तमानपत्र हे स्वातंत्र्याच्या काळात वापरले गेले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आली आणि त्यानंतर डिजिटल माध्यमे आली. त्यांचा आज विकास झाला आहे. ते पुढे म्हणाले, डिजिटल माध्यमात दुरुस्ती करायला वेळ मिळत नाही. कारण प्रत्येक प्रकारची माहिती त्वरित पोहोचवायची असते. कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा हेतू काय? हे समजणे गरजेचे आहे. डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा हेतू काय? हे या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराला कळणे आवश्यक आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, आपल्या पिढीने शेकडो वर्षात घडणारी क्रांती मागील १० /१५ वर्षात घडलेली अनुभवली. एआय च्या माध्यमातून कोणत्याही विषयावर जगात कुठेही भाषण करता येईल अशी स्थिती आहे. पण ह्याच बरोबर त्या अनुषंगांने येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान देखील आपण ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. डिजिटल मीडिया मुळे पत्रकारिता चे लोकशाहीकरण झाले आहे. पत्रकारिता करताना कोणते नियम पाळावे? कोणती स्व:आचारसंहिता घालून ठेवावी, हे सुद्धा महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
तेजोनिधी भंडारे यांनी ॲनिमेशन/ ए आय, प्रणवकुमार चित्ते यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी, मोहिनी घाटे यांनी सायबर क्राईम, प्रणव पवार यांनी नवीन डिजिटल धोरण या विषयावर तर ग्रामीण पोलीस सायबर गुन्हे शाखा प्रमुख उमेश तावसकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. विकास माने यांनी सूत्रसंचालन केले. उल्का मोकासदार आभार प्रदर्शन केले.
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्यावतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन कर्वेनगर येथील सी एम ए भवन मध्ये करण्यात आले होते. यावेळी आदि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment