बजाज अलायन्झ Life eTouch सह सर्वसमावेशक संरक्षण !

पुणे, 7th August 2024: मुदत विमा हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा, तसेच मानसिक शांतता प्रदान करतो. परवडणाऱ्या प्रीमियमवर भरपूर लाइफ कव्हर ऑफर करण्यासोबतच मुदत विमा पॉलिसीधारकाचे अकाली निधन झाल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतो. सर्वसमावेशक टर्म प्लॅनचे महत्त्व ओळखणारे असेच एक उत्पादन म्हणजे बजाज अलायन्झ लाइफ eTouch. व्हॅल्यू पॅक वैशिष्ट्यांसह तीन प्रकारांमधून निवडण्याची लवचिकता हे उत्पादन देते, जे पॉलिसीधारकांच्या कुटुंबांना त्यांच्या जीवनाचे लक्ष्य योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करते.

वाजवी किमतीत मार्केटमध्ये Bajaj Allianz Life eTouch सारखी नावीन्यपूर्ण, व्हॅल्यू पॅक उत्पादने उपलब्ध असतात. मात्र, ग्राहकांना पुरेशा कव्हरेजचे महत्त्व समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अंडर इन्शुरन्स ही भारतातील एक महत्त्वाची समस्या आहे, ज्यामध्ये अनेक व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे कव्हरेज मिळत नाही. सामान्य नियम असे सांगतो की, एखाद्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 पट जीवन विमा संरक्षण असावे. सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थापन सेवा देणाऱ्या Bajaj Allianz Life eTouch सह पॉलिसीधारक हा बेंचमार्क पूर्ण करू शकतात.

Bajaj Allianz Life eTouch चे तीन प्रकार आहेत: Life Shield, Life Shield ROP आणि Life Shield Plus. हे तीनही प्रकार कायमस्वरूपी अपघाती अपंगत्व किंवा जीवघेणा आजार झाल्यास प्रीमियम माफ करण्याच्या इनबिल्ट वैशिष्ट्यासह येतात. लाइफ शील्ड आरओपी व्हेरियंटसह पॉलिसीधारकाला एक-वेळची रक्कम मिळेल, जी पॉलिसी मुदतीत टिकून राहिल्यास मॅच्युरिटीवर भरलेल्या एकूण प्रीमियम्सच्या बरोबरीची असेल. लाइफ शील्ड प्लस व्हेरियंटमध्ये अपघाती झाल्यास नियमित मृत्यू लाभाव्यतिरिक्त अतिरिक्त पेआउट प्रदान केले जाते.

बजाज अलायन्झ लाइफ संपूर्ण लोकसंख्या आणि विशेषतः महिलांसाठी मुदत विम्याची आवश्यकता मान्य करते. ग्राहक प्रथम हे आपले वचन पाळत, कंपनीने महिलांसाठी आरोग्य व्यवस्थापन सेवा ऑफर करत, सर्वसमावेशक कल्याणासाठी आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. या सेवांमुळे वैद्यकीय सुविधांपर्यंत सहज आणि जलद पोहोचता येते. एकाच उत्पादनात ग्राहकांना त्यांची सगळी आरोग्य उद्दिष्टे साध्य करता येतात.

महिलांसाठी तयार केलेल्या आरोग्य व्यवस्थापन सेवा ऑफर करून कंपनीने सर्वांगीण कल्याणासाठी आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. या सेवांमुळे वैद्यकीय सुविधा सहज आणि जलद उपलब्ध होतात. ग्राहकांना त्यांची आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात. विशेष म्हणजे, एकाच उत्पादनामध्ये सगळ्या सेवा एकत्रित असतात. त्यामध्ये सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, नियमित तपासणी आणि किरकोळ उपचारांसाठी OPD इन-क्लिनिक सल्लामसलत समाविष्ट आहे. हा वैद्यकीय सल्ला आणि संपूर्ण वैद्यकीय सेवा ऑफर्सचा त्वरित लाभ मिळवून देतील.

महिला ग्राहकांच्या सर्वांगीण कल्याणाची निश्चिती करत तयार केलेल्या मूल्यवर्धित आरोग्यसेवांच्या श्रेणीत याचा समावेश होतो

  • सर्वसमावेशक आरोग्य तपासणी : आरोग्याचे संभाव्य त्रास शोधण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी नियमित, तसेच काटेकोर आरोग्य मूल्यमापन - कर्करोग तपासणी, मधुमेह, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल चाचण्या, कॅल्शियम सीरम चाचणी, संपूर्ण रक्त चाचणी.
  • ओपीडी इन-क्लिनिक सल्ला : नियमित तपासणी आणि किरकोळ उपचारांसाठी बाह्यरुग्ण विभागाच्या सेवांची सोय. स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक आणि जनरल फिजिशियन इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पॉलिसीधारक घेऊ शकतात.
  • डॉक्टर इन्स्टा-कन्सल्टेशन्स : बजाज अलियान्झ लाइफ असिस्ट ॲपद्वारे प्रमाणित डॉक्टरांशी वैद्यकीय सल्लामसलत करण्यासाठी तत्काळ प्रवेश.
  • आरोग्य प्रशिक्षक : निरोगी जीवनशैली राखण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी वैयक्तिकृत आहार आणि पोषण सल्ला बजाज अलायन्झ लाइफ असिस्ट ॲपद्वारे मिळू शकतो.
  • भावनिक तंदुरुस्ती : मानसशास्त्रज्ञांशी ॲपवर नियमित सल्लामसलत केली जाऊ शकते.
  • नेटवर्क सवलत : भागीदार नेटवर्कमध्ये ऑनलाइन औषधे ऑर्डर करणे, निदान चाचण्या बुक करणे आदी आरोग्यसेवांच्या श्रेणीवर विशेष सवलत.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न