नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, '' प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून खूप आनंद होतोय. दक्षिण मुंबईसारख्या भागातही या चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफूल’ चे बोर्ड्स ही दिसत आहेत. अवयवदान हा खरोखरच खूप गंभीर विषय आहे आणि लोकांमध्ये याविषयीचे गैरसमज दूर करणे खूप आवश्यक आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय अतिशय प्रभावीपणे अनेकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे माझ्या पहिल्याच चित्रपटाचा विषय मी हा घेतला. आमच्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमने अवयवदानाची प्रतीज्ञा केली आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट पाहून प्रेक्षक भारावून जातील.''
'लाईफलाईन'ची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.
Comments
Post a Comment