ठाणेकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण, अद्वितीय दागिन्यांची पर्वणी

श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे ठाण्यात उद्घाटन; दुर्मिळ डिझाईनच्या 'क्षितिजा'ने वेधले लक्ष

ठाणे: गेल्या सात दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझाईनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. ठाण्यातील राम मारुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी झाले. अद्वितीय, कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईन्सच्या दागिन्यांनी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले.
७२ वर्षांची परंपरा, ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले. प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर-कुलकर्णी, रोहन कुलकर्णी, प्रियांका नगरकर आदी उपस्थित होते.
वसंत नगरकर म्हणाले, "पुण्यातील तुळशीबाग, लक्ष्मी रोड येथे गेल्या ७२ वर्षांच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची पर्वणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. सोने, चांदी, हिरे यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत. कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत. मंगळसूत्र, नेकलेस, कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार, तसेच कस्टमाइज डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांनी आवर्जून या दालनाला भेट द्यावी."
प्रसाद नगरकर म्हणाले, "आपल्याकडील डिझाईनचे वेगळेपण ही आपली खासियत आहे. युनिक असे डिझाईन असल्याने आमची ओळख डिझाइनर ज्वेलर्स अशीही आहे. सोने, चांदी, हिरे, पोल्की यातील नाविन्यपूर्ण दागिने येथे आहेत. पारंपरिक दागिने, बकुळी, पोहे हार, ठुशी, श्रीमंत हार, कोल्हापुरी साज, वज्र टीका, चंद्रहार, मोत्यांचे दागिने, फ्युजन डिझाईनचे कुंदन नेकलेस, गेरू नेकलेस, नकास वर्क, मोती कुंदन, गहू तोड्याचे नेकलेस राणी व लक्ष्मीहार अशा असंख्य दागिन्यांची गुंफण येथे असणार आहे."
श्रीपाद नगरकर यांनी १९५२ मध्ये श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची मुहूर्तमेढ रोवली. वल्लभ आणि वसंत या नगरकर बंधूनी नगरकर ज्वेलर्स यशस्वीपणे वाढवले. नगरकरांची तिसरी पिढी प्रसाद आणि पुष्कर या अँटिक, युनिक दागिन्यांची परंपरा पुण्यासह राज्यातील इतर शहरांत घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहेत. तिसरी शाखा असलेल्या ठाण्यातील हे दालन जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फूट जागेत असून, ३५ पेक्षा अधिक कर्मचारी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सज्ज आहेत, असे पूजा नगरकर-कुलकर्णी यांनी नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

नवरदेवाने लग्नाच्या शुभ प्रसंगी का आणि कशासाठी उचलेले 'हे' टोकाचे पाऊल; 'अंतरपाट' १० जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार