छत्रपती राजाराम मंडळाच्या श्री सुवर्ण मंदिर प्रतिकृतीच्या कामाचा शुभारंभ वासा पूजनाने उत्साहात संपन्न
यंदा मंडळ गुरु नानक देवजी यांच्या ५५५ व्या जयंती निमित्त पंजाब मधील अमृतसर येथील श्री सुवर्ण मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून साकारत आहे याचा शुभारंभ आज वासा पूजनाने करण्यात आला गुरुनानक दरबार कॅमचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी ,गुरुनानक दरबार कॅमचे विश्वस्त मकीजा, गणेश पेठ गुरुद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा,मनजीत सिंग विर्दी,उत्तम केटरर्स लकी सिंग या शीख समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते आज वासा पूजन करण्यात आलं
यावेळी आमदार रवींद्र धंगेकर,पुनीत बालम ग्रुपचे पुनीतजी बालन , माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी नगरसेविका गायत्री खडके सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर संजय बी चोरडिया, डीएस साऊंडचे सुनील शेंडगे.,कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे अध्यक्ष राजाभाऊ बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर ,उपाध्यक्ष अरुण गवळे ,मंडळाचे विश्वस्त मंगेश झोरे, सुनील निंबाळकर,संग्रामसिंह शिंदे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाद्यवृंद ढोल ताशा पथकाच्या वाद्यपूजनाचा कार्यक्रमही पार पडला
मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या श्री सुवर्ण मंदिराची प्रतिकृती ६५ फूट उंच असणार आहे त्यात मंदिर ४२ फूट रुंद आणि ६४ फूट लांब असणार आहे मंदिराच्या बाजूने बारा फूट तलाव असणार आहे मंदिराच्या मागील भिंत ९०फूट बाय ३५ फूट असणार आहे तर महाप्रवेशद्वात ६४ फूट बाय ३२ फूट असणार आहे हि प्रतिकृती कला दिग्दर्शक मिरॅकल इव्हेंट चे विनायक रासकर हे साकारणार आहेत तर वीरेंद्र आत्मजा प्रत्यक्ष हे मंदिर साकारणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितले
Comments
Post a Comment