मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ च्या धमाल विनोदी एपिसोडमध्ये द ग्रेट खली हजेरी लावणार
या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोच्या आणखी एका धमाल भागात प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशीच्या उपस्थितीत या शोमधले कसलेले विनोदवीर आपल्या अतरंगी विनोदाने प्रेक्षकांना भरपूर हसवतील.
होस्ट हर्ष गुजरालच्या स्टँड अप अॅक्टमध्ये ‘माता’ हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असेल. विनोदी अंगाने सादर केलेल्या या विषयात आईच्या प्रेमातला अतिरेक, सतत टोकण्याची सवय वगैरे हमखास दिसणाऱ्या गोष्टींवर रोख असेल. हा अॅक्ट प्रेक्षकांचे नक्कीच भरपूर मनोरंजन करेल.
‘मोटिव्हेशनल एअरलाईन्स’ नावाच्या गॅगमध्ये परितोष त्रिपाठी आणि हेमांगी कवी एअरलाइनच्या क्रूच्या रूपात आणि केतन सिंह एका उत्साही मोटिव्हेशनल स्पीकरच्या रूपात प्रेक्षकांना एक हास्य-सफर घडवून आणतील. यात मोटिव्हेशनल स्पीकर्स आणि एअरलाइनमधल्या प्रवासाचे व्यंगात्मक रूप दाखवले जाईल. ‘ऑनेस्ट इंटरव्ह्यु’ या अॅक्टमध्ये कुशल बद्रिके आणि केतन सिंह अनुक्रमे उमेदवार आणि मुलाखतकार यांच्या भूमिकांमध्ये दिसतील. अगदी सामान्य, क्षुल्लक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या इंटरव्ह्युमधला पोकळपणा दाखवण्यात येईल आणि एका अत्यंत औपचारिक प्रक्रियेची विनोदी बाजू दाखवली जाईल.
‘खली ट्रेनर रोस्ट’ द्वारे सिद्धार्थ सागर प्रकाशझोतात येईल. यात पर्सनल ट्रेनिंगच्या बागुलबुवाचे व्यंगचित्र प्रेक्षकांसमोर येईल आणि द ग्रेट खलीशी निगडीत काही अतिशयोक्तीपूर्ण टेकनिक्सला लक्ष्य बनवण्यात येईल. परितोष त्रिपाठी आणि हर्ष गुजराल सामील झाल्यानंतर तर हा ‘खली रोस्ट’ भलताच गंमतीशीर होईल. कारण त्यावेळी परितोष एका रेसलरच्या अभिनिवेशात असेल आणि प्रेक्षकांची हसून पुरेवाट होईल!
Comments
Post a Comment