प्रसिद्द फ्रेंच नाटकावर आधारित "उच्छाद' नाटकाचा रविवार ४ फेब्रुवारी २०२४ पुण्यात शुभारंभ!

भद्रकाली प्रॉडक्शन्स आणि राखाडी स्टुडिओ निर्मित
प्रसाद कांबळी यांच्या 'भद्रकाली प्रॉडक्शन्स'ची ६० वी नाट्यकृती 'उच्छाद' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रा. ९.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड - पुणे येथे होणार आहे.या नाटकाची निर्मिती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी,अमेय गोसावी यांची आहे.
‘उच्छाद’ हे विनोदी नाटक यास्मिना रेझा यांच्या ‘गॉड ऑफ कार्नेज’ या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचा निरंजन पेडणेकर यांनी केलेला मराठी अनुवाद असून दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. मुलांच्या खेळीच्या वातावरणात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाचे दात तोडले जातात. मुलांनी केलेल्या किरकोळ भांडणाचा गुंता सभ्यपणे सोडवण्यासाठी एक जोडपं दुसऱ्या जोडप्याला घरी बोलवतं. पण ही बैठक हळूहळू एका वेगळ्याच दिशेने जाऊन सभ्यतेचे बुरखे कसे फाडते, हे या नाटकात आपल्याला पहायला मिळणार आहे. 
कलाकार सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, निरंजन पेडणेकर, सिद्धेश धुरी असून नाटकाचे नेपथ्य पूर्वा पंडित, प्रकाशयोजना यश पोतनीस व स्वच्छंद, रंगभूषा आणि वेशभूषा आशिष देशपांडे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न