"भक्षक" मध्ये सई साकारणार अनोखी भूमिका !
२०२४ ची ओपनिंग दमदार करत सई पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकायला तयार होत आहे. नेटफ्लिक्स प्रस्तुत " भक्षक " या चित्रपटात सई पोलिस कॉन्स्टेबल ची भूमिका साकारताना दिसणार आहे. रेड चिली सोबतचा सईचा पहिला प्रोजेक्ट असून सई या नव्या प्रोजेक्ट बद्दल उत्सुक आहे. नव्या वर्षातला पहिला हिंदी चित्रपट आणि तो ही नेटफ्लिक्स सोबत करताना सई साठी हे वर्ष नक्कीच खास ठरणार आहे. भूमी पेडणेकर , संजय मिश्रा या उत्कृष्ट कलाकाराच्या सोबतीने सई भक्षक मध्ये दिसणार आहे. भक्षक चा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सई ला पुन्हा एकदा ओटीटी वर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हिंदी आणि मराठी चित्रपटात आजवर सई ने आपल्या कामाची चमक कायम दाखवून दिली आहे. नव्या वर्षात सई नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे पक्क आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सई प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना " भक्षक " हा चित्रपट नक्कीच वेगळा विषय ठरणार आहे. अभिनयातील वेगळं पणा जपत विविध भूमिका साकारून सई कायम चर्चेत राहिली आहे. २०२४ वर्षात सई ओटीटी, चित्रपट , वेब सीरिज मधून दिसणार तर आहेच पण हे वर्ष तिच्या साठी बहुभाषिक अभिनयाचं ठरणार आहे यात शंका नाही.
Comments
Post a Comment