कॅमेरा आणि तंत्रापेक्षाही त्यामागची दृष्टी महत्त्वाची शाई गोल्डमन यांचा नव्या छायाचित्रकरांना सल्ला

कॅमेरा आणि तंत्रापेक्षाही त्यामागची दृष्टी महत्त्वाची असते, असा सल्ला ‘सिनोनिम्स’,, ‘किंडरगार्डन टीचर’, ‘द वॉंडरर’, अशा चित्रपटांचे पुरस्कार विजेते छायाचित्रकार शाई गोल्डमन यांनी नव्या छायाचित्रकरांना सल्ला दिला. पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) आज छायाचित्रकारितेच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. ‘पिफ’चे सहसंचालक विशाल शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
ते म्हणाले, “कॅमेरा हे मशीन आहे. त्याला तुम्ही चालवायचे आहे. ते तुम्ही कसे चालवता, हे महत्त्वाचे आहे.. कॅमेऱ्यामागची दृष्टी महत्त्वाची आहे. प्रत्येक शॉटमागील उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. तंत्रापेक्षा कथा आणि दृष्टिकोण महत्त्वाचा आसतो.”
ते म्हणाले, की नैसर्गिक प्रकाश आणि लोकेशन मला आवडते. लोकेशन हे माझ्या शूटिंगमध्ये एक पात्र म्हणून येते. कॅमेरा कुठे ठेवायचा, चित्रपटाचे शूटिंग कसे करायचे. याचा विचार स्क्रिप्ट लिहिण्यापासून सुरू होतो. प्रत्येक शॉट हा मी वैयक्तिक माझा असल्यासारखा घेतो.” 
ते पुढे म्हणाले, की शेवटी दिग्दर्शक महत्त्वाचा असतो. कोणत्याही शॉटवर मतभेद झाले तर दिग्दर्शकाचे मत महत्त्वाचे असते. बजेट किती आहे. यावर कॅमेरा कोणता वापरायचा हे ठरते. आता तंत्राच्या दृष्टीने सगळे सोपे झाले आहे. तरीही दृष्टी महत्त्वाचीच आहे. 
‘नॉर्थ बाय नॉर्थ वेस्ट’, ‘सिनोनिम्स’ या चित्रपटांचे प्रसंग दाखवून त्याविषयी छायाचित्रकारांना छायाचित्रणाची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न