'पुन्हा शिवाजीराजे भोसले’ मधील सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक !
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे, जो त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा एकदम वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची आणि सोबतीला चित्रपटाबद्दलचीही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ''या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर का...