Posts

Showing posts from April, 2025

'पी.एस.आय. अर्जुन'मधील प्रमोशनल साँगला ‘पुष्पा’फेम नकाश अजीज यांचा आवाज, सुपरस्टार अंकुश चौधरी सुद्धा बनला गायक

Image
सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्वत्र ट्रेंडिंग ठरत आहे. बॉलिवूडलचे प्रसिद्ध गायक ज्यांनी ‘पुष्पा टायटल साँग’, ‘जबरा फॅन’, ‘क्यूटीपाय’, ‘ स्लो मोशन’ यांसारखे हिट गाण्यांचे गायक नकाश अजीज व अंकुश चौधरीच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला अनिरुद्ध निमकर यांनी कमाल संगीत दिले असून जयदीप मराठे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.  संगीतकार अनिरुद्ध निमकर म्हणतात, “‘धतड ततड धिंगाणा’ या गाण्याची चाल आणि कॅची संगीतामुळे ते अत्यंत धमाकेदार बनले आहे. या गाण्यातील काही संवाद गाण्याला आणखी आकर्षक बनवतात. आ...

आतली बातमी फुटली' चित्रपटाचा रंजक टिझर भेटीला

Image
मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी  घेऊन आले आहेत. या  चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित  होणार आहे.   एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. ही रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे 'आतली बातमी फुटली’ हा चित्रपट. टिझर मधून हे रहस्य, धमाल आणि चित्रविचत्र घटना यांची  मजेशीर झलक पाहायला  मिळतेय.  ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली ...

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंचच्या वतीने निदर्शने

Image
पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक हिंदू बंधवांना गोळ्या घालून ठार केले गेले. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम यांच्या पुढाकाराने प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंच च्या वतीने कमला नेहरू पार्क, प्रभात रस्ता येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. काश्मीर, पहलगाम येथिल हिंदु पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाक लष्कर प्रमुख असिम मुनीर व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आले. या मध्ये महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. आणि स्त्री शक्तीचे संगठन दिसून आले. केतकी देशपांडे, सुवर्णा ऋषि, रंजना नाईक, किमया ढेकणे ,अलका पेशवे ,भक्ती साठे ,माधवी अगरवाल, अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिराम ,विवेक देव,हर्षल मोरे,योगेश जोगळेकर अजिंक्य मेहता, प्रदीप देशपांडे, मिलिंद टकले, पुष्कर लिमये तसेच कामाला नेहरू पार्क मधील नागरिकांचा सहभाग दिसून आला.

गृन्डफॉस सीयूई 120 (CUE 120) तर्फे भारतासाठी भारतात तयार केलेल्या ऊर्जा कार्यक्षम पंप तंत्रज्ञानासाठी नवीन मापदंड प्रस्थापित

Image
पुणे, इंडिया – २४ एप्रिल २०२५: पंपिंग सुविधा पुरवणारी एक जागतिक पुरवठादार कंपनी गृन्डफॉसने भारतीय बाजारपेठेसाठी भारतात विकसित केलेले सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर केले आहे. या नव्या उत्पादनाचा उद्देश पंपच्या कार्यक्षमतेवर अधिक अचूक नियंत्रण ठेवणे आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आहे. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की सध्या सुमारे 70% व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह्ज (VFDs) फॅक्टरीच्या डीफॉल्ट सेटिंग्सवर कार्यरत आहेत. त्या बर्‍याचदा त्यांच्या विशिष्ट अनुप्रयोगांसाठी अनुकूल नसतात. अशा प्रकारच्या अनुकूल नसण्याच्या अभावामुळे ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक ऊर्जा वापर आणि कामकाज खर्च वाढतो. परिणामी, अनेक प्रणाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि कार्यक्षमता वाढविण्यात त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यात अपयशी ठरतात. सीयूई 120 हे उत्पादन या समस्यांवर उपाय म्हणून डिझाइन करण्यात आले असून, हे भारतीय बाजारपेठेसाठी विशिष्ट सानुकूलित उपाय सादर करते. त्यामुळे अधिक अचूक नियंत्रण व स्थानिक गरजांनुसार ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा शक्य होते....

तामिळ वेल्फेअर असोसिएशन पुणे* तर्फे तामिळ नवीन वर्षाच्या आनंदोत्सवानिमित्त सुमधुर गीतांच्या,नृत्यांच्या व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न

Image
पुणे -तामिळ वेल्फेअर असोसिएशन पुणे तर्फे तामिळ नवीन वर्षानिमित्त आनंदोत्सवानिमित्त सुमधुर  गीतांच्या,नृत्यांच्या व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आशा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट सी. एन. रविशंकर  उपस्थित होते. तसेच यावेळी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, वानवडी प्रभाग चे भा. जा. प.अध्यक्ष  महेश पुंडे व दिनेश होले,तामिळ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  अरविंद पिल्ले, सचिव संतोष कुमार, फोरसाईट महाविद्यालयाचे प्राचार्य  रवींद्र पिल्ले, . एन मूर्ती केसवाल, जीवन पिल्ले,शंकर पिल्ले,  श्याम पिल्ले, दिनेश पिल्ले विजयकुमार स्वामी राजेश पिल्ले, नारायण पिल्ले, नंद गोपाल पिल्ले, श्रीधरन पिल्ले, चंद्रशेखर पिल्ले संजीवनी मुनस्वामी, शर्मिला पिल्ले,  राणी मुनस्वामी  परिमला पिल्ले,जयश्री पिल्ले, विजयालक्ष्मी पिल्ले, श्रेयस पिल्ले  आदी मान्यवर उपस...

आता माहोल टाईट, आला बुंगा फाईट... शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं "बुंगा फाईट" सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!

Image
मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.  शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना चित्रपटाचं धमाल गाणं "बुंगा फाईट" हे मराठी गाणंही आता रसिकांच्या पसंतीस उतरतंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याच गाण्याची चर्चा सुरु आहे.  सजना चित्रपटातला "बुंगा फाईट" हे गाणं एक पॉप्युलर डान्स नंबर ठरत आहे ह्यात काही शंका नाही. प्रेक्षक आत्ताच ह्या गाण्यावर थिरकायला लागली आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजतय, प्रेक्षक डान्स करताना दिसत आहेत. अशातच आता प्रेक्षकांना हे गाणं लाईव्ह सुद्धा ऐकायला मिळालं. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे ह्यांनी हे गाणं गायलं आहे आणि नुकतच त्यांनी प्रेक्षकांचं लाईव्ह मनोरंजन केलं आणि त्यांना प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी वेग वेगळ्या ठिकाणी परफॉर्म केलं. 'सजना' सिनेमातील "बुंगा फाईट" हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना वेड लावत आहे हे आनंद शिंदे ह...

नादच नाय करायचा! जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक' चं रोमँटिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' प्रेक्षकांच्या भेटीला !!

Image
जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं शीर्षक गीत रिलीझ करण्यात आलं होतं ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा सिनेप्रेमींना भुरळ घालायला ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण ,जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रीत या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. अभिनेत्री जुई वर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पहायला मिळते जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे जुई चा शिफॉन सारी मधला कातिल लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. गाण्याचा हुकस्टेप सुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे. तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे. 'पोराचा बाजार उठला रं' हे गाणं रसि...

२५ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येतोय ‘फुले’ – एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास

Image
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ' फुले' हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रूपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे. ‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत 'स्कॅम १९९२' फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या...