‘वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मालिका विश्वात ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसेच 'ओम नमो व्यंकटेशाय' या दाक्षिणात्य चित्रपटात 'तिरुपती बालाजी' यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यांचे विलोभनीय पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'फ...