Dr. शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र
अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर सक्रिय असणारे हे दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटात दिसणार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी चित्रपटातील नावाजलेले अभिनेते. कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या हौशी नाट्य संस्थेतर्फे ते १९८२पासून दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’, ‘जोतिबा फुले’, तसेच ‘आईनस्टाईन’ यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेऊन ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आईची गोष्ट’, ‘द मदर‘, ‘द घरवाली’ या आपल्या नाटयकृतींमध्ये स्त्री-सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या सर्जनशील कलावंत म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे ओळखल्या जातात. ‘घरत गणपती’ या चित्रपटात हे दोघे आजी आणि आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कुटुंबप्रमुख असलेले ‘आप्पा’ आणि ‘मा...