Posts

Showing posts from February, 2026

बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं 'बालभारती गीत' प्रेक्षकांच्या भेटीला

Image
बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त 'बालभारती गीत' हे खास भावस्पर्शी गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अनेक पिढ्यांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार या गीतातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत. या गाण्याला लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचा आवाज लाभला असून, अवधूत गुप्ते यांचं संगीत आणि दासू वैद्य यांचे शब्द या गाण्याला लाभले आहेत. या गीतासाठी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचे मार्गदर्शन लाभले असून संकल्पना किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची आहे.  बालभारती नाव उच्चारताच मनात दरवळणारा पुस्तकांचा सुगंध, मुखपृष्ठांवरील बोलकी चित्रं, कवितांच्या ओळींमधून मिळालेली भाषेची पहिली ओळख आणि संस्कारक्षम दृष्टी या सगळ्याच भावना या गीतातून प्रत्ययास येतात. हे गाणं पाहाताना आणि ऐकताना रसिक नकळत आपल्या शाळेच्या दिवसांत, बालपणाच्या आठवणींत हरवून जातील. एकवीरा म्युझिकवर हे 'बालभारती गीत' उपलब्ध असून, त्याचं सादरीकरण एकविरा म्युझिक युट्युब चॅनेलवर पाहायलाही तितकंच सुंदर आणि भावनिक ठरत आहे. बालभारती संचालिका ...

मानसी नाईकची मध्यवर्ती भूमिका असलेला "मन आतले मनातले"

Image
आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत "मन आतले मनातले" या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक अभिनेता सुरेन महापात्रा, अभिनेता उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. अतिशय नावीन्यपूर्ण कथा, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण...