पहिल्या 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' स्पर्धांचा दिमाखदार समारोप
पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे ११ ते १८ ऑगस्ट २०१५ दरम्यान झालेल्या पहिल्या 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' मध्ये भारतातील पॅरा नेमबाजांनी दमदार कामगिरी केली. भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५० आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशभरातून ६०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या प्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर,द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पॅराशूटिंग चेअरपर्सन आणि प्रेसिडेंट पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे जयप्रकाश नौटियाल ,जीवनगौरव शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज चे कार्यकारी संचालक अजय मुकुंद जगताप,कामेश मोदी,संजय शेंडगे,प्रतीक मोडक,किरण कानडे,किरण लोहार आदि मान्यवर उपस्थित होते. नौटीयाल म्हणाले, सर्व सहभागी खेळाडूंनी या स्पर्धेत रंगत आणली, सर्व पदक विजेत्यांचे मी अभिनंदन कर...