पुण्यात BGauss ग्राहक हस्तांतरण आणि फूड ट्रेल सोहळ्याला खास प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशीची उपस्थिती
पुणे, 21 डिसेंबर 2024 – इलेक्ट्रिकल सोल्युशन्स क्षेत्रातील प्रगल्भ अनुभव असलेल्या RR Kabel आणि RR Global हाउसचा भाग असलेल्या BGauss या प्रख्यात जीवनशैली सुधारक कंपनीने पुण्यात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला. या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम स्टाईल, शाश्वतता आणि फूड ट्रेल यांचा अद्वितीय संगम होता. समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कंपनीच्या नवीन ग्राहकांसाठी आयोजित केलेला भव्य हस्तांतरण समारंभ आणि त्यानंतर BG Eats फूड ट्रेल – पुण्यातील उत्कृष्ट खाद्यस्थळांमधून एक अनोखी व स्वादिष्ट यात्रा सर्वांना घडविण्यात आली. BGauss चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. हेमंत काब्रा यांनी म्हटले की, “वेग हा केवळ BGauss चा उद्देश नाही. त्याही पलीकडे आम्ही एक अशी एकोसीस्टिम तयार करण्याचा उद्देश ठेवतो, जिथे नवकल्पना, शाश्वतता आणि सांस्कृतिक अनुभव एकत्र येतात. RUV350 आणि C12 हे प्रदर्शन, स्टाईल आणि आधुनिक प्रवाशांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. पुण्याच्या विविध खाद्यसंस्कृतीच्या परिघात या वाहनांचा उत्सव साजरा करत, आम्ही एक असे समुदाय तयार करत आह...